महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय कौन्सिल कृती सत्र तोरणमाळ येथे संपन्न
![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय कौन्सिल कृती सत्र तोरणमाळ येथे संपन्न
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर यांची विशेष उपस्थिती


मुंबई, ठाणे ( मनिलाल शिंपी ):महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघाचे कृती सत्र तोरणमाळ नंदुरबार जिल्हा या ठिकाणी आयोजित केले होते, सदर कृती सत्रास मुख्याध्यापक संघाचा राज्याचा उपाध्यक्ष म्हणून शिक्षक आमदार कोकण विभाग श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी उपस्थित राहून राज्यातील मुख्याध्यापक संघाच्या कौन्सिल सदस्यांशी संवाद साधला, विधिमंडळामध्ये मंडळामध्ये कोणकोणते प्रश्न उपस्थित केले व कोणकोणत्या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. कृती सत्रामध्ये मराठी माध्यमाच्या शाळेतील कमी होत चाललेली पटसंख्या, तसेच पाठ्यपुस्तकामध्येे नव्यानेच वह्यांची पाने जोडणे बाबत शासनाने घेतलेली भूमिका, विविध विषयांवर चर्चा झाली थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ हे प्रसिद्ध असून आदिवासी जीवनाविषयी माहिती इतिहास जाणून घेण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी पहिल्या दिवसाचे कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्व मुख्याध्यापकांसह तोरणमाळ परिसरातील विविध भागांना भेटी देऊन डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांशी चर्चा केली , त्यांची संस्कृती ,परंपरा व जीवनमान कसे जगतात त्याविषयी माहिती जाणून घेतली, अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या विभागासाठी पर्यटन स्थळ विकसित करून आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध व्हावा व लहान मुलांच्या शिक्षणासाठी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी शासनाकडे करणे बाबत चे आश्वासन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तेथील आदिवासी बांधवांना दिले. याप्रसंगी मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष जेके पाटील सर, सचिव शांताराम पोखरकर, कोषाध्यक्ष संदेश राऊत, विद्या समिती अध्यक्ष महेंद्र गणपुले, सचिव झांबरे सर, सूर्यवंशी सर, नाईक सर ,मोझर सर, संजय पाटील सर,साताऱ्याचे अध्यक्ष सचिन नलावडे , ठाण्याचे अध्यक्ष गणेश पाटील , शिवाजीराव किलकिले , जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रवीण लोंढे, मुंबईचे अंबरसिंग मगर , पानसरे सर ठाकूर सर व राज्याचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यस्तरीय कृती सत्राच्या आयोजन नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित केले होते, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील , कुंदन पाटील, रघुवंशी सर अन्य जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांनी उत्तम नियोजन केले होते.

