यज्ञेश्वर बागराव यांची भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनमध्ये कार्यकारी समिती सदस्य म्हणून निवड ,बिर्ला महाविद्यालय आणि जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव
![]()


यज्ञेश्वर बागराव यांची भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनमध्ये कार्यकारी समिती सदस्य म्हणून निवड बिर्ला महाविद्यालय आणि जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव
मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी ):दिनांक 18.05.2023 चेन्नई येथे भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनच्या निवडणूकीत ठाणे जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशनचे चे अध्यक्ष, व कल्याण डोंबिवली येथील नामवंत बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक यज्ञेश्वर बागराव यांची कार्यकारी समिती सदस्य या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ट्रायथलॉन फेडरेशन ऑफ इंडियन चे अध्यक्ष रामचंद्रन, महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन चे अध्यक्ष दयानंद कुमार, राकेश गुप्ता, के राजेंद्रन, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन चे अधिकारी सायरस पोंचा उपस्थित होते. ही निवड 2023 ते 2027 या कालावधी साठी करण्यात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश एस नंबीराजन यानी काम पाहिले.या निवडणुकीसाठी देशातील 25 राज्यातील राज्य संघटनेचे सदस्य उपस्थित होते.यज्ञेश्वर बागराव यांचा निवडीबद्दल ठाणे जिल्हा क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षण समिती, कल्याण डोंबिवली शारीरिक शिक्षक शिक्षण मंडळ , मुंबई विद्यापीठ स्पोर्ट्स कमिटी आणि बी. के.बिर्ला शिक्षण समुह, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पाटील यांच्या सह सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. तसेच,पेंढारकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक उदय नाईक, प्रगती महाविद्यालयाचे स्पोर्ट डायरेक्टर प्रा.लक्ष्मण इंगळे, अग्रवाल महाविद्यालयाचे स्पोर्ट डायरेक्टर विजय सिंग,कल्याण क्रीडा भारतीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक महादेव क्षिरसागर, वाणी विद्यालयाचे क्रीडा संघटक गजानन वाघ, कृष्णा माळी, अनंत उतेकर, स्काऊट गाईड स्थानिक संस्था डोंबिवली चे सचिव जगदीश उगले,अध्यक्ष अशोक जगताप तसेच कल्याण डोंबिवली मधील सर्व क्रीडा संघटक,क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षक,बंधू भगिनी , खेळाडू या सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले आहे. मानव सेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, व क्रीडा संघटक मनिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण परिवार यांच्याकडून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

