1 min read

धनदाई महाविद्यालयातील प्रा. डॉ. लिलाधर पाटील विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळावर नियुक्त.

Loading

धनदाई महाविद्यालयातील प्रा. डॉ. लिलाधर पाटील विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळावर नियुक्त.

अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ. लिलाधर पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचा धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, उपप्राचार्य डॉ किशोर पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. जितेंद्र माळी, डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. प्रशांत पाटील, सुभाष सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
धनदाई महाविद्यालयातील विविधअभ्यासक्रम मंडळावर ही चौथी नियुक्ती असून यापूर्वी प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांची राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाच्या अभ्यास मंडळावर, ग्रंथपाल डॉ. प्रवीण पवार यांची ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर तर डॉ. राहुल इंगळे यांची भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली होती. महाविद्यालयाच्या दृष्टीने ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे डी डी पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.
प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांच्या नियुक्ती बद्दल विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार, विद्यापीठाच्या भाषा प्रशालेच्या प्रमुख प्रो. डॉ. मुक्ता महाजन, इंग्रजी अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रो. डॉ. भूपेंद्र केसुर, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रो. डॉ संदीप नेरकर, प्रा. नितीन पाटील, डॉ. योगेश तोरावणे, प्रा. मीनाक्षी इंगोले, समजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *