ढेकूसिम येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या
![]()

ढेकूसिम येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या
अमळनेर-तालुक्यातील ढेकूसिम येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.राजेंद्र नगराज पाटील वय -५०,रा.ढेकूसिम) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी राजेंद्र पाटील यांनी गुरुवारी पहाटेला आपल्या शेतातील खळ्यात बांधलेल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेबाबत अमळनेर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, दोन मुली ,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

