सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजयाताई वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान..
![]()





सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजयाताई वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान..
प्रसंगी डॉ. विजयाताई वाड यांच्या सुकन्या व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती..
सुप्रसिद्ध साहत्यिका डॉ. विजयाताई वाड यांना तापी – पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकताच त्यांना प्रदान केला शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा 2021. 22 रोजी आयोजित राज्यस्तरीय पहिले
शिव,बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 फेब्रुवारी 2022 रोजी आदिशक्ती संत मुक्ताईनगरीत मोठ्या थाटात संपन्न झाले याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजयाताई वाड यांना त्यांच्या तब्येतीमुळे उपस्थिती देता आली नाही त्यामुळे अंधेरी येथील त्याच्या निवासस्थानी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र आणि डॉ. उज्जैनकर यांनी संपादित केलेले प्रबोधनाची ज्ञानदिंडी हे पुस्तक भेट देऊन हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये फाउंडेशनच्या राज्य संघटक सौ. पुनमताई राणे यांनी प्रास्ताविक करून डॉ. विजयाताई वाड यांच्या कार्याविषयी माहिती दिली तर डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी फाउंडेशनचे कार्य विशद करून आदरणीय डॉ. विजयाताई वाड यांच्या कार्याची सुद्धा उपस्थितांना माहिती दिली याप्रसंगी विजयाताई वाड यांची सुकन्या, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य प्रा. विनायक वाडेकर राज्य संपर्कप्रमुख सौ. फर्जना डांगे राज्य समन्वयक सौ. लताताई गुंठे राज्य महिला संघटक सौ. पूनमताई राणे ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेशभाऊ उज्जैनकर जळगाव जिल्हा सल्लागार श्री मनोहरराव रोकडे बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. निवृत्ती जाधव चि. आर्यन वाडेकर यांची विशेष उपस्थिती होती याप्रसंगी प्रा. विनायक वाडेकर यांनी जीवन गौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले डॉ. विजयाताई वाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे कार्य हे अखंड सुरू असून भविष्यातही या फाउंडेशनची गगनभरारी व्हावी आणि मला मिळालेला हा पुरस्कार मी स्वीकारला असून मी फाउंडेशनची विशेष डॉ. शिवचरण उज्जैनकर व सर्व मान्यवरांचे आभार मानते असेही याप्रसंगी डॉ.विजयाताई वाड म्हणाल्या.

