1 min read

अखेर न.पा.उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला.
— मराठी लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश.

Loading

अखेर न.पा.उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला.
मराठी लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश.

जळगाव: जिल्ह्यातील नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे वेतन माहे मार्च २०२३ पासून निधीअभावी प्रलंबित होते. यासंदर्भात जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेद्वारा मा.श्री. आर.एच.शर्मा साहेब (अधिक्षक वेतन पथक कार्यालय, माध्य.) व डॉ.नितीन बच्छाव साहेब (शिक्षणाधिकारी माध्य.जि.प.जळगाव), प्रा.डॉ.संजयजी शिंदे (राज्याध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. सदर प्रश्नाला संघटनेद्वारा मराठी लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून वाचा फोडण्यात आली होती. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकतीच डि.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ, मुन्सीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर, आ.गं. हायस्कूल व ना. गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा, साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल या चारही उच्च माध्यमिक विद्यालयांच्या वेतनासाठी अत्यावश्यक निधीची तरतूद करण्यात आलेली असून सोमवारी माहे मार्चचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा होणार असून माहे एप्रिल व मे महिन्याचे एकत्रित वेतन हे लवकरच अदा करण्यात येणार आहे अशी माहिती जुक्टो अर्थात जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, सचिव प्रा. सुनील सोनार, उपाध्यक्ष प्रा.डॉ.अतुल इंगळे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, प्रा. डी. डी.पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील, प्रा.शैलेश राणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिलेली आहे.
या संपूर्ण लढ्यात मराठी लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या सहकार्याबद्दल जुक्टो संघटनेद्वारा न्यूज नेटवर्क चमूचे विशेष आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *