1 min read

पडघा येथे तहसील कार्यालय, कपिल पाटील फाउंडेशन व भाजपा तर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक दाखले वाटप कार्यक्रम पडघा येथे संपन्न!

Loading

पडघा येथे तहसील कार्यालय, कपिल पाटील फाउंडेशन व भाजपा तर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक दाखले वाटप कार्यक्रम पडघा येथे संपन्न!

मुंबई,ठाणे दि.१२(मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता ज्या शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता आहे त्यासाठी भिवंडीचे तहसीलदार श्री.अधिक पाटील यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय भिवंडी, कपिल पाटील फाउंडेशन व भाजपा पडघा- कुरुंद गट यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक दाखले वाटप कार्यक्रम पडघा येथे शुक्रवार दिनांक १२/५/२०२३ रोजी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात महाजनवाडी सभागृह पडघा येथे नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी श्रीमती सिंधू खाडे यांच्या अध्यक्षतेखाली वाटप करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सौ.श्रेया श्रीकांत गायकर, भाजपा नेते श्रीकांत गायकर, माजी उपसरपंच अभिषेक नागावेकर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील, आर.एस.
पी. कमांडर डॉ.मनीलाल रतिलाल शिंपी, पडघा मंडळ अधिकारी संतोष आगिवले, वडपे तलाठी गणेश पाटील, लोणाड तलाठी संजीव धात्रक, पडघा तलाठी प्रतिभा चव्हाण, अर्जुनली तलाठी रोहन पवार, खालिंग तलाठी सुरेश राठोड, बोरिवली तर्फे राहुर तलाठी रोहिणी सावंत, कोशिंबी/आमणे तलाठी
भगवान पाटील, व आदी मान्यवर उपस्थितीत होते,
या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला ,स्थानिक वास्तव्य दाखला ,डोमिसाईल दाखला,व ज्येष्ठ नागरिक दाखला यांचे वाटप करण्यात आले, या शिबिराला स्थानिकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे जवळजवळ शंभरहून अधिक दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी श्रीमती सिंधू खाडे यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना दिली.
या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचे स्वागत व आभार भाजपा नेते श्रीकांत गायकर यांनी व्यक्त केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *