मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे पुरस्कार जाहीर
![]()

मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे पुरस्कार जाहीर
मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.सन -२०२२-२३ च्या पुरस्काराचे मानकरी आहेत. प्रकाश जडे, दामाजीनगर,वसंत गायकवाड,सांगली, प्राचार्य देवेंद्र पुनसे, यवतमाळ, प्राचार्य डॉ.राजेंद्र शेंडगे, सोलापूर, शशिकांत हिंगोणेकर, जळगाव, अप्पासाहेब खोत, पन्हाळा, मंटिल्डा अँथनी डिसल्वा, वसई, डॉ.सुरेश सावंत, नांदेड, मच्छिंद्र ऐनापुरे,जत, डॉ.अविनाश सांगोलेकर,पुणे, डॉ.मारोती घुगे, जालना, डॉ.किसन माने ,सांगोला, प्रा. अरुण घोडके, इस्लामपूर, विजय शेंडगे ,पुणे, प्रीती वाडीभस्मे, वर्धा, डॉ.संभाजी पाटील, लातूर, मेघना साने ,ठाणे यांना देण्यात येत आहेत.
मुक्त सृजन वालाई काव्य गौरव पुरस्कारासाठी सोलापूर येथील प्राचार्य राजेंद्र शेंडगे यांच्या वर्तुळाच्या आत बाहेर अस्वस्थ मी व जळगाव येथील कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या युद्धरत कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे.पेरियार (ई.व्ही रामास्वामी) मुक्त सृजन कादंबरी पुरस्कारासाठी सांगली येथील वसंत गायकवाड यांच्या तथागत गोतम बुद्ध व यवतमाळ येथील प्राचार्य डॉ. देवेंद्र पुनसे यांच्या इथे जिंकला बाजार या कादंबरींची निवड करण्यात आली आहे.आद्यकथाकार चक्रधर स्वामी मुक्त सृजन कथा पुरस्कारासाठी जाखले-पन्हाळा येथील अप्पासाहेब खोत यांच्या काळीज विकल्याची गोष्ट व वसई येथील मंटिल्डा अँथनी डिसल्वा यांच्या निवांत या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे.महात्मा जोतीराव फुले वैचारिक लेखन व समीक्षक पुरस्कार नांदेड येथील डॉ.सुरेश सावंत यांच्या बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध व जत येथील मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या विचारांच्या प्रदेशात या ग्रंथांची निवड करण्यात आली आहे.कै. विठ्ठल ठोंबरे मुक्त सृजन संशोधक पुरस्कार पुणे येथील डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे काव्यवाङ्मय: एक शोध व जालना येथील डॉ. मारोती घुगे यांच्या 1980 पूर्वीची ग्रामीण कविता: प्रेरणा आणि प्रवृत्ती या ग्रंथांची निवड करण्यात आली आहे.स्व.कांताबाई व स्व.रेव्ह.एल.बी. सोनवणे मुक्त सृजन चरित्र -आत्मचरित्र पुरस्कार सांगोला येथील डॉ. किसन माने यांच्या राजकीय मानदंड भाई गणपतराव देशमुख व इस्लामपूर येथील प्रा. अरुण घोडके यांच्या रयतधारा या चरित्र ग्रंथांना देण्यात येत आहे. कै.नारायणराव दहिफळे मुक्त सृजन ललित गद्य पुरस्कार पुणे येथील विजय शेंडगे यांच्या पिपाणी व वर्धा येथील प्रीती वाडीभस्मे यांच्या देहदीप्तीमधील चंद्र या ललित ग्रंथाला देण्यात येत आहे. कै. कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले मुक्त सृजन संकीर्ण पुरस्कार लातूर येथील डॉ. संभाजी पाटील यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता व ठाणे येथील मेघना साने यांच्या मराठी सातासमुद्रापार या ग्रंथाला देण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप २५००/-रुपये स्मृतीचिन्ह मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे आहे. सर्व पुरस्कार विभागण्यात आलेले आहेत. याशिवाय रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था-प्रमुखाला मुक्त सृजन उत्कृष्ट संस्था-प्रमुखाचा पुरस्कार देण्यात येत आहे.सदर पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा दामाजीनगरच्या प्रकाश जडे यांना देण्यात येत आहे. याशिवाय परीक्षकांच्या शिफारशीनुसार काही विशेष उल्लेखनीय साहित्यकृतीसाठी विशेष पुरस्कार या वर्षापासून नव्याने सुरू करण्यात आले आहेत. मुक्त सृजन विशेष पुरस्कार वर्धा येथील डॉ.मीरा निचळे यांच्या भावांजली, बदलापूर येथील मंदाकिनी पाटील यांच्या आत्मपीठ , बेळगाव येथील हर्षदा सुंठणकर, यांच्या कपडे वाळत घालणारी बाई , उदनवाडी सांगोला येथील मुकुंद वलेकर यांच्या शिवारमाती डॉट कॉम, पंढरपूर येथील संगीता मासाळ-टकले यांच्या गावाकडचा पाऊस, छत्रपती संभाजी नगर येथील अलकनंदा घुगे यांच्या काव्यनंदा व चिखली येथील विजयकुमार कस्तुरे यांच्या उद्रेक या कवितासंग्रहास व डोंबिवली येथील नागु विरकर यांच्या हेडाम कादंबरीस जाहीर करण्यात आले आहेत.असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.महेश खरात, सहसंपादक डॉ, रामकिशन दहिफळे, डॉ. संतोष देशमुख व कवयित्री प्रिया धारूरकर यांनी जाहीर केले. सदर पुरस्काराचे परीक्षण डॉ. मुरहरी केळे, डॉ.भीमराव वाघचौरे, डॉ.संतोष देशमुख, कवयित्री प्रिया धारूरकर यांनी केले आहे. पुरस्कार वितरण सोहळा मुक्त सृजन साहित्य संमेलनामध्ये घेण्यात येईल. हे पुरस्काराचे चौथे वर्ष असून 317 साहित्यकृती पुरस्कारासाठी आल्या होत्या.

