1नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू कारण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक संपन्न
![]()


1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू कारण्यासंदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक संपन्न
ठाणे,मुंबई( मनिलाल शिंपी )1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून गेले 13 दिवस राज्य भरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान येथे उपोषणाला माजी आमदार श्रीकांत देशपांडे व माजी आमदार दत्तात्रय सावंत सर , जुनी पेन्शन समन्वयकक संघाच्या वतीने बसले होते, उपोषण सुरु झाल्यापासून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर या आंदोलनास वारंवार भेट देत होते व आंदोलन कर्त्याची भेट घेत होते आणि सोबतच ह्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष्य कसे वेधले जाईल व शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिक्षण मंत्री मा. दिपकजी केसरकर साहेब यांची वारंवार भेट घेऊन सकारात्मक चर्चा करीत होते. आज आंदोलनाचा 13 वा दिवस असताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी आज सकाळ पासून मुख्यमंत्री साहेबांना भेटून आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मिटिंग घडवून आणण्याचे प्रयत्न केले, माजी आमदार श्रीकांत देशपांडे सर व समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सकाळी वर्षा बंगल्यावर भेट तर दुपारी परत सह्याद्री अतिथी गृह भेट घेऊन आजच्या मीटिंगसाठी हट्ट धरला व संध्याकाळी शिष्ट मंडळ बोलवून सह्याद्री येथे अखेर आज आमदार म्हात्रे सरांच्या, प्रयत्नाने आज जुनी पेन्शन कृती समितीची भेट घडवून आणली आणि मिटिंग यशस्वी केली. आजची मिटिंग जवळपास 25 मिनिटाची मिटिंग संपन्न झाली त्यामध्ये मुखमंत्री साहेबांनी जुनी पेन्शन बाबत सहमत असून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांवर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ शासन सकारात्मक विचार करत असून काही तांत्रिक अडचणी सोडवून आम्ही लवकरच निर्णय देऊ असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासीत केले. या संदर्भात किती बजेट लागेल याची फाईल तयार करण्याकरता मा. सचिवांना आदेश दिले, मिटिंग करिता माजी आमदार मा. दत्तात्रेय सावंत, माजी आमदार मा. श्रीकांत जी देशपांडे, सुनील भोर सर ,सचिन नलावडे सर, वाले सर, प्रसाद गायकवाड सर, समाधान घाडगे समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात, सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी केली* *अत्यंत चांगली चर्चा झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पहिले राज्यातील मुख्यमंत्री असतील त्यांनी अतिशय सकारात्मक उत्तर शिष्ट मंडळाला मंडळाला दिल्याने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने आझाद मैदानास सुरू असल्याा आंदोलन थांबवले. तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सेवानिवृत्त व मृत शिक्षक - शिक्षकेतरांना 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार त्वरित लाभ द्यावेत , त्याकरता स्वतंत्र शासन आदेश काढावा अशी ही विनंती केली, तसा आदेश सूचना सचिवांना देण्यात आल्या. 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी सुकाणू समितीने बैठक घेतली असून, त्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे, संपूर्ण डाटा जमा करण्याचं काम लवकरच पूर्ण होईल, त्यानुसार जुन्या पेन्शनचा निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत, समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

