अंधेरीत उद्या भव्य संयुक्त जयंती महोत्सव
![]()
अंधेरीत उद्या भव्य संयुक्त जयंती महोत्सव
केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते 5 हजार महिलांना मोफत साडी वाटपचे आयोजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आ) अंधेरी तालुका आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणी तथागत गौतम बुध्द यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते 5 हजार महिलांना साडीचे वाटप करण्यात येणार आहे. समाजसेविका छाया संजय खंडागळे, रिपाइं चे अंधेरी तालुका अध्यक्ष संजयभाऊ खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता होली फॅमिली स्कुल ग्राउंड, एम.आय.डी.सी. अंधेरी (पूर्व) येथे संयुक्त जयंती महोत्सव साजरा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळयाला उत्तर – पश्चिम मुंबई जिल्हयातील आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं चे अंधेरी तालुका अध्यक्ष संजय खंडागळे यांनी केले आहे.

