1 min read

खान्देशचे सुपुत्र उपकुलसचिव डॉ. कैलास भटा बोरसे यांनादूरशिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

Loading

खान्देशचे सुपुत्र उपकुलसचिव डॉ. कैलास भटा बोरसे यांना

दूरशिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

धुळे- भारतातील ज्येष्ठ होमिओपॅथ, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील सहृदयी व्यक्तीमत्त्व प्राचार्य डॉ. शांतीलालजी देसर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, न्याय, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यरांना दरवर्षी ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारार्थींमध्ये नंदूरबार तालुक्यातील खोक्राळे येथील खान्देशचे सुपुत्र डॉ. कैलास भटा बोरसे, उपकुलसचिव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची निवड झाली असून डॉ. कैलास बोरसे यांच्या दूर शिक्षण क्षेत्रात असलेल्या येागदानाबद्दल त्यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार रविवार दि. 14 मे रोजी सायंकाळी 5-30 वाजता गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी औरंगाबाद येथे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष मा.आ. हरिभाऊ नाना बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. कैलास बोरसे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून यापूर्वीही त्यांना आपल्या दूरशिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार मिळाले आहेत. शेतीमातीशी नाते असलेल्या खोक्राळे येथील ज्येष्ठ समाजसेवक स्व.भटाभाया धनगर यांचे ते सुपुत्र असून धुळे येथील निवृत्त पी.एस.आय. युवराज बोरसे यांचे ते लहान भाऊ आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *