1 min read

असे पण घडते
सत्ता संघर्षात माणुसकीचे दर्शन!

Loading

असे पण घडते
सत्ता संघर्षात माणुसकीचे दर्शन!

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आणि परंपरा आहे.या संस्कृतीचे आणि परंपरा जपण्याचे कार्य महाराष्ट्राने नेहमीच केलेआहे.राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल जवळ येऊन ठेपला आहे. एकाच पक्षात असलेले नेते, आमदार समोरा समोर लढाईच्या तयारीत आहे. खोके, गद्दार, बाप पळवला, चिन्ह चोरले,जनता माफ करणार नाही, हिम्मत असेल तर समोर या अशी भाषा वापरणारे नेते व त्यांच्या बातम्या गेली दहा महिने आपण पाहत आहोत. शेवटी माणूसच आहे. राग, लोभ, मोह, माया, द्वेष, तिरस्कार व पुन्हा मैत्री व राजकीय डावपेच हे आपण पाहतोच.
एकत्र बसणारे व डावपेच करणारे नेते शेवटी माणूसच. असे च एक नेते व मुंबईचे माजी महापौर श्री. विश्वनाथ महाडेश्वर याचे मंगळवार दिनांक 09 मे रोजी ह्रदय विकाराने निधन झाले. राजकीय वैर असेल तरी मत भेद असले तरी मन भेद नव्हता. या आपल्या मित्राच्या निधनाने सर्वांनाच चटका लागला. आणि त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेकांनी उपस्थित लावली. तेथे नव्हता कोणता गट ना कोणता तट.शिंदे गटाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आपल्या मित्राच्या अंतिम दर्शनासाठी पोहचले. त्याचवेळी समोर आले उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब. आपले राजकीय वैर काही काळासाठी विसरून दोघांनी एकमेकांचे सांत्वन केले. दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कुटुंबियांना त्यांनी दिलासा दिला.
सत्ता, पैसा, पद, प्रतिष्ठा हे सारे काही मागे ठेवून मनुष्य निघून जाणार आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर एक शिक्षक म्हणून कार्यरत होते. सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा आपुलकीने वागण्याचा शिक्षकी स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत जपला. माणूस म्हणून जगताना संघर्ष बाजूला ठेवून ठाकरे गटातील आणि शिंदे गटातील नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमदार अनिल परब दाखवलेला आदर्श माणुसकी जपणारा आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आमच्या वाचकांकडून आणि संपादक मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *