1 min read

न्यु इंग्लिश स्कूल,प्र.डांगरी येथे छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Loading

अमळनेर प्रतिनिधी-आमच्या न्यू इंग्लिश स्कूल,प्र.डांगरी येथे छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली . ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मुलींना सायकल वाटप कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डांगरी विदयालायचे स्थानिक चेअरमन बापूसो महारु रामदास शिसोदे होते. मारवड संस्थेचे संचालक आबासो चंद्रकांत रामराव शिसोदे तसेच एरंडोल येथील केंद्रप्रमुख किरण भरत शिसोदे ,न्यू इंग्लिश स्कूल प्र.डांगरी चे मुख्याध्यापक एल एन सैंदाने यांचे हस्ते मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.
सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *