श्री क्षेत्र विटनेर येथे १२ मे पासून मोफत वारकरी बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन
![]()

श्री क्षेत्र विटनेर येथे १२ मे पासून मोफत वारकरी बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन
श्री सद्गुरू संत तानाजी महाराज प्रासादिक भव्य अध्यात्मिक वारकरी बालसुसंस्कार शिबिराचे यावर्षीचे आयोजन दि.१२ मे ते २१ मे दरम्यान श्री संत श्रावण बाबा व श्री संत तानाजी महाराज यांच्या पावन भूमीत श्री क्षेत्र विटनेर ता.चोपडा याठिकाणी करण्यात आले आहे
हे शिबीर पूर्णपणे मोफत असून या शिबिरात विद्यार्थ्यांना अध्यात्मिक व शैक्षणिक विकासाचे धडे देत मुलांना वारकरी अभंग,चाली,टाळ, पखवाज तसेच गीतेचे अध्याय,नमनवटिका,पंचपदी, हरिपाठ, काकडा असे विविध अध्यात्मिक पैलू शिकवले जातील.
या शिबिरात सकाळी ५ ते ६ काकडा,प्राणायाम,सकाळी ८ ते ११ प्रशिक्षण,दुपारी ११ वाजता मधुकरी पद्धतीने भोजन, १२ ते २ आराम,२ते ५ प्रशिक्षण,५ ते ६ हरिपाठ व मैदानी खेळ,रात्री ८ ते १० हरिकीर्तन अशी रूपरेषा राहील,दरम्यान हरिकर्तनात दि.१२ ला हभप अविनाश म दातर्ती,दि.१३ ला प्रा.सी.एस.पाटील महाराज,दि.१४ ला हभप जयेश म वाघाडी,दि.१५ ला हभप समर्थ म नागदुली,दि १६ ला हभप किर्तीताई म शेवगे,दि.१७ ला हभप गुलाब म लोणकर, दि.१८ ला हभप बाळा काका अनवर्दे,दि.१९ ला हभप धीरज म रुंधाटी, दि.२० ला गौप्रेमी गजानन म वरसाडे तर दि.२१ ला सकाळी ९ ते ११ यादरम्यान सद्गुरू संत तानाजी महाराज यांचे वंशज व शिबिराचे मार्गदर्शक महंत प्रा.हभप सुशिल म,विटनेरकर यांच्या कालाच्या किर्तनाने शिबिराची सांगता होणार आहे.
या शिबिराचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी विखरण ता.एरंडोल येथे हे शीबिर सम्पन्न झाले होते,तर पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ वर्षाचे शिबिराचे नारळ वर्डी ता.चोपडा व २०२५ चे वर्षीचे शिबीर बहादरपूर ता.पारोळा येथे सम्पन्न होणार आहे.
यावर्षीच्या शिबिराचे अयोजक समस्त विटनेर ग्रामस्थ असून यास कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर समिती,संत श्रावण बाबा भजनी मंडळ,समस्त तरुन मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्याना या शिबिरात पाठवावे असे आवाहन महंत प्रा.सुशिल महाराज यांनी केले आहे

