1 min read

शिवसेनेत महिलांना जो आदर व सन्मान मिळतो तो इतर कुठेही नाही, शिवसेना(उ बा ठा) उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांचे शिवसेना नाशिक जिल्हा महिला आघाडी च्या बैठकीत प्रतिपादन

Loading

शिवसेनेत महिलांना जो आदर व सन्मान मिळतो तो इतर कुठेही नाही, शिवसेना(उ बा ठा) उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांचे शिवसेना नाशिक जिल्हा महिला आघाडी च्या बैठकीत प्रतिपादन.

नाशिक दि 5,
राज्यात व देशात होऊ घातलेल्या महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा, व विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी काल नाशिक येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जिल्ह्यातील महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे घेण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते सुनील बागुल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर भाऊ बडगुजर हे उपस्थित होते. जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीची ताकद वाढविण्यासाठी व राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला नाशिक जिल्ह्यातून सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या. सध्या राज्याची राजकीय परिस्थिती पाहता लवकरच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल व उध्दव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेनेमध्ये महिलांना जो आदर व सन्मान दिला जातो तो इतर कुठल्याही राजकीय पक्षात दिला जात नाही. त्यामुळे माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर महिलांचा विश्वास असून राज्यातील अनेक बड्या राजकीय कुटुंबातील महिला शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत व करण्यासाठी इच्छुक आहेत असे प्रतिपादन यावेळी शुभांगी ताई पाटील यांनी केले.
यावेळी शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असंख्य महिला उपस्थित होत्या व लवकरच त्यांचा शिवसेना नेते संजयजी राऊत व पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याचे शुभांगी ताई पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *