डोंबिवली येथे एच.बी. स्पोर्ट्स कंपनी कडून क्रीडा शिक्षकांची पिळवणूक
![]()
डोंबिवली येथे एच.बी. स्पोर्ट्स कंपनी कडून क्रीडा शिक्षकांची पिळवणूक
ठाणे, कल्याण ( मनिलाल शिंपी )डोंबिवली पूर्व मधील क्रीडा शिक्षक विनायक पाटील यांनी क्रीडा शिक्षक, बंधू भगिनींना विनंती केली आहे की डोंबिवली पूर्व मधील रॉयल इंटरनॅशनल या शाळेत कोणीही क्रीडा शिक्षक म्हणून जॉईन होऊ नये .
सदर शाळेमध्ये जॉईन होताना खूप कमिटमेंट केले जाते, या शाळेत एच.बी.स्पोर्ट्स कंपनी च्या नावाने स्पोर्ट्स डिपार्टमेंट चालू आहे, या शाळेत मॅनेजमेंट कडून प्रत्येक शिक्षकांना 22000 पगार दिला जातो, पण या पगारातून एच.बी. स्पोर्ट्स चे हर्षल भोजनाईक, भावना पाटील, व गौरांग के. हे तिघेही प्रत्येक
क्रीडा शिक्षकांकडून कडून 7000 रुपये घेतात, आणि शाळेकडून सुध्दा 25000रुपये पगार घेतात एकूण 11 शिक्षक आहेत प्रत्येक महिन्यात शिक्षकांकडून *77000 +25000=102000रु घेतात,
तसेच कोणतीही स्पर्धा असली की त्यानंतर एक दोन महिने काम करून झाले की त्यांना पेमेंटसाठी हे पेपर द्या हा रिपोर्ट द्या नाही दिला तर पगार कट केला जातो, विविध प्रकारे त्रास देऊन काम सोडण्यास मजबूर केले जाते.किंवा काढून टाकले जाते, शाळेकडून क्रीडा शिक्षकांचा पगार अकाऊंट मध्ये ट्रान्स्फर केला जातो, नंतर तो पगार हर्षल भोजनाईक, भावना पाटील, गौरांग के.जो सध्या ओमकार इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोच म्हणून आहे. पगार झाल्यानंतर हे क्रीडा शिक्षकाला फोन करून धमकी देऊन सांगितले जाते स्कूल मधून चुकून तुमच्या अकाऊंट ला पगार आला आहे, तो लवकर ऑनलाईन ट्रान्स्फर करा. नाहीतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिली जाते, असे अनेक लोकांच्या बाबतीत तेथे झाले आहे व होत आहे तरीही सर्वांना अशा स्कूलवर निकृष्ट दर्जाच्या एच.बी. स्पोर्ट्स क्लब पासून सावधान तेचा इशारा म्हणून हा मॅसेज ग्रुप मध्ये केला आहे.सर्व कोचेस यांना त्यांनी परत घेतलेल्या टक्केवारीची स्क्रीन शॉट फोटो पाठवले आहेत.
एच बी टीम मधील हर्षल भोजनाईक,
भावना पाटील,स्पोर्ट कोच गौरांग के. हे क्रीडा शिक्षकांना धमकी देऊन ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार विनायक पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

