जुन्या पेंशनबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी-आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी
![]()

जुन्या पेंशनबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी
मुंबई प्रतिनिधी( मनिलाल शिंपी ):आझाद मैदानावर सुरू असलेल्या 1 नोव्व्हेबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट देऊन सदर विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक तातडीने आयोजित करून जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आपण आग्रह आहोत, “माझ्या शिक्षकांना पेन्शन नसेल तर मलाही पेन्शन नको” असे पेन्शन नाकारणारे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर जुन्या पेन्शन साठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
तसेच आजच सकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन तातडीची बैठक आज किंवा उद्या तातडीची बैठक घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

