सानेगुरुजी विद्यालयात ध्वजारोहणचा मान मिळाला माजी विद्यार्थीनीला.
![]()



अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे , साने गुरुजी विद्यालयात १ मे ला सालाबादाप्रमाणे संस्थेचे सचिव श्री . संदिप घोरपडे सर यांच्या संकल्पनेतून माजी विद्यार्थीनीला ध्वजारोहणाचा मान दिला जातो . यावर्षी देखील माजी विद्यार्थानी श्रीमती भारती संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या दिवसाचे औचित्य साधून विधवा महिलांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम ठेवण्यात आला . श्रीमती भारती पाटील व प्रमुख अतिथी श्रीमती राजश्री राजेश पाटील यांची श्रीमती अनिता दिपक बोरसे यांनी खणानारळाने ओटी भरून त्यांच्या स्त्रीत्वाचा सन्मान करण्यात आला . समाजातील विधवा महिलांना मानाचे स्थान मिळावी अशी संकल्पना श्री घोरपडे सरांची होती . यावेळी शाळेतील श्रीमती सावंत , श्रीमती वाघ व श्रीमती यशोदा महाले यांनी कार्यक्रमाला आलेल्या विधवा माहिलांची ओटी भरून त्यांचा मानसन्मान समाजपुढे ठेवण्यात आला . प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम यांनी केले . मनोगतात श्रीमती भारती पाटील यांनी हा सन्मान माझ्या एकटीचा नसून सर्व माजी विद्यार्थीनीं चा तर आहेच पण माझ्या सर्व विधवा बहिणींचा पण आहे . हा सम्मान माझ्या गुरुजनांमुळेच आहे . हिंगोणे गावच्या सरपंच श्रीमती राजश्री पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेने खरोखरच स्त्रीयांना समाजात परत मानाचे स्थान मिळवून दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले . अध्यक्षीय भाषणात श्री .घोरपडे सर यांनी भारती पाटील व राजश्री पाटील यांना आम्ही आमंत्रित केले नसून साने गुरुजी विचारांनी तुम्हाला आमंत्रित केले असल्याचे सांगितले . त्यांनीही ग्रामपंचायतीत असा कार्यक्रम राबविण्यात यावा यामुळे समाजात जनजागृती होईल . NMMS शिष्यवृत्तीस पात्र साने गुरुजी कन्या हायस्कुल व नुतन माध्यमिक विद्यालयाच्या दोन विदयार्थिनी व तीन विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले . तसेच श्री . संदिप बाबुराव घोरपडे ( सचिव – अ . शि . प्र . म . ) उपशिक्षक , साने गुरुजी नु . माध्य विदयालय अमळनेर , यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार , तसेच – संचालक डॉ. यशवंतराव देशमुख यांची महाराष्ट्र हॉकी संघाचे उपाध्यक्ष पदी निवड झाली . मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार , श्री . मुकेश अमृत पाटील यांना जनमत प्रतिष्ठाण तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , श्री . दिपक महाजन यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , श्री . अनिल पाटील सर यांना आधार संख्येतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार , श्री . मनोहर पाटील सर यांना मानवाधिकार संघटनेतर्फे आदर्श पुरस्कार , सौ . वसुंधरा लांडगे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल ,श्री.स्वप्निल पाटील यांची मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी पदी नियुक्ती बाबत सन्मान व कौतुक करण्यात आले . कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री . हेमकांत अनंतराव पाटील , सचिव श्री संदिप घोरपडे , उपाध्यक्ष श्री . गुणवंतराव गुलाबराव पाटील , सहसचिव श्री अँड. अशोक बाविस्कर, संचालक श्री . यशवंतराव देशमुख , एस पी निकम , बी डी शिंदे , पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत ,भारती पाटील यांचे माता पिता मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे , मुख्याध्यापक श्री .सुनिल पाटीत , मुख्याध्यापक श्री . संजिव पाटील , मुख्याध्यापिका सौ . महाजन मॅडम ,संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी श्री विलास चौधरी , शाळांचे शिक्षक प्रतिनिधी श्री.मगरे , श्री.दिलीप पाटील , श्री.उघडे सर , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद , पालक व विद्यार्थी सह इतर सर्व उपस्थित होते . सुत्रसंचालन श्री विलास चौधरी यांनी तर आभार श्री . मुकेश पाटील सर यांनी केले .

