1 min read

दिव्यांग शिक्षकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- शुभांगीताई पाटील

Loading

अपंग समावेशित शिक्षकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही
…….शुभांगी ताई पाटील

धुळे प्रतिनिधी
धुळ्यात काल दिनांक एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यातील अपंग शाळांवरील अपंग समावेशित शिक्षकांचा मेळावा हिंदी राष्ट्रभाषा भवन धुळे येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्यभरातून अपंग समावेशित शाळांवरील सुमारे 300 ते 400 शिक्षक उपस्थित होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील या उपस्थित होत्या. प्रास्ताविकात व आपल्या मनोगतात या शिक्षकांवर सुरुवातीपासूनच कशाप्रकारे अन्याय झालेला आहे याबाबत अनेक शिक्षकांनी आपले मत मांडले. ज्यामध्ये सुरवाती पासून म्हणजे सुरुवातीलाच नोकरीला लागते वेळी आम्हाला अनेक शिक्षकांना अनेक गोष्टी अंधारात ठेवून नोकरी दिली गेली. त्यात शैक्षणिक आहार्यता बाबत माहिती झाली. नोकरीला लागल्यानंतर तीन वर्षाच्या आत विशेष शिक्षक आहार्यता घे ण्याची अट कळाली व त्यामुळे विशेष शिक्षक बनण्यासाठी चे शिक्षण घेतले. यात बहुतांश सर्व लोकांनी ही अट नंतर पूर्ण केली. त्यानंतर शासनाने वेळोवेळी वेगवेगळे नियम ,अटी, परिपत्रके काढत या शिक्षकांवर वेळोवेळी अन्याय केला. नकळत नोकरीच्या आशेवर आम्ही या सर्व दृष्टचक्रात कधी अडकलो ते आम्हाला देखील कळाले नाही. आणि आज सर्वांच्या लेखी आम्ही काहीतरी मोठा गुन्हा केला अशा भावनेने शासनापासून ते प्रशासनापर्यंत व अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत समाजातील सर्वच घटकांकडून आमच्याकडे दोशी म्हणून बघितले जाते. वास्तविक पाहता यामध्ये सर्वात जास्त भरडले जाणारे आम्ही शिक्षक असताना व आमचे आयुष्य उध्वस्त झाले असतांना केवळ आमच्याकडे सर्व अपराधी दृष्टीने पाहतात असे मत अनेक शिक्षकांनी मांडले. त्याचबरोबर आता तर चौकशीच्या नावावर शिक्षकांना सेवा समाप्तीच्या नोटीसा देण्यात येत असल्याची माहिती यावेळी शिक्षकां कडून राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांना देण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात राज्याध्यक्ष माननीय शुभांगी ताई पाटील यांनी या शिक्षकांना उद्देशून सांगितले की “यापुढे अपंग समावेशित शिक्षकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही” मी सुरुवातीपासूनच या शिक्षकांच्या बाजूने होते, परंतु विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत तुमच्या प्रश्नांकडे थोडे दुर्लक्ष झाले! परंतु आता असे होणार नाही कारण ,यामध्ये केवळ शिक्षकांचा दोष नाही तर ज्यांनी नियुक्त्या दिल्या, त्याचप्रमाणे ज्यांनी वैयक्तिक मान्यता दिल्या, आधी वेतन सुरू केले व आता सेवा समाप्तीच्या नोटीस देत आहेत. त्या सर्व घटकांचा यामध्ये दोष आहे, त्यामुळे केवळ शिक्षकांना दोषी ठरवून त्यांच्यावर केला जाणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही! ज्यावेळी वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या, वेतन सुरू करण्यात आले , त्यावेळी या गोष्टींची माहिती शासनाला नव्हती का ? आणि जर त्यांना याबाबत माहिती होती तर त्यांनी चुकीच्या पद्धतीने वैयक्तिक मान्यता दिल्याच कशा , त्यामुळे सुरुवातीपासून नियुक्ती प्राधिकरण, वैयक्तिक मान्यता, वेतन निश्चिती, वेतन सुरू करणे या सर्व गोष्टी करते वेळी शासन झोपले होते का? यामध्ये जे दोषी असतील त्यांना देखिल दोषी धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा या शिक्षकांवर वर्षानुवर्षे होणारा अन्याय दूर करून त्यांना नियमित केले पाहिजे. व त्यासाठी यापुढील लढा तुमच्या सर्वांच्या साथीने आपण लढणार असल्याचे यावेळी शुभांगी ताई पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जग सोडून गेलेल्या शिक्षकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेची उपशाखा म्हणून महाराष्ट्र टीचर्स अपंग समायोजित शिक्षक संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. व त्यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्त देण्यात आल्या. सूत्रसंचालन श्री पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी केले यावेळी राज्य कार्याध्यक्ष पदी गिरीश महाले सर, तर राज्य संघटक पदी गुलाब ठोबरे सर,यांची तर इतर पदाधिकारी म्हणून बागुल सर, पाटील सर, खांडेकर सर, सोनवणे सर,ई यांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *