1 min read

तीन दिवशीय मोफत करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा,
आयएएस तृप्ती धोडमीसे – नवत्रे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन

Loading

तीन दिवशीय मोफत करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
आयएएस तृप्ती धोडमीसे – नवत्रे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे बारावी उत्तीर्ण व त्यापुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 8 मे ते 10 मे 2023 असे तीन दिवस मोफत करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक 8 मे रोजी सकाळी साडेआठ वाजता आयएएस तृप्ती धोडमिसे-नवत्रे यांच्या शुभहस्ते होणार आहे यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील जळगाव जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा.प्र.विभाग स्नेहा कुडचे (पवार) वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ मुख्य वित्त व लेखा अधिकारी बी डी पाटील वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र खैरनार जि प जळगाव अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे एपीआय लेखक व अभिनेता लीलाधर पाटील मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेत एमपीएससी यूपीएससी इत्यादी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन होणार असून त्यासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सामान्यज्ञान स्पर्धा वक्तृत्वस्पर्धा प्रश्नमंजुषा गीत गायन व वादविवाद इत्यादी स्पर्धा व रोख बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा व बक्षीस पुढील प्रमाणे
प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस११११ रुपये द्वितीय ७५१ रुपये तृतीय ५०१ रुपये रोख स्वरूपात दिले जाणार आहे. विविध देणगीदारांच्या देणगीतून हे बक्षीस दिले जाणार आहेत यात कै. हरिभाऊ चिंधा पाटील स्मृती प्रित्यर्थ श्रीमती सरला हरिभाऊ पाटील यांचे तर्फे सामान्यज्ञान स्पर्धेसाठी विजय जगन्नाथ बोरसे निवृत्त स्टेट बँक अधिकारी यांचे तर्फे गीत गायन स्पर्धेसाठी कै.रामदास सोनू वाघ यांचे स्मरणार्थ चिटणीस प्रकाश वाघ यांच्यातर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी कै. सागर कुलकर्णी नगावकर यांचे स्मृती पित्यर्थ उज्वला नगावकर व चंद्रकांत नागावकर यांचे तर्फे तर वादविवाद स्पर्धेसाठी स्व.राजाराम बुधो कोळी यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्या देणगीतून देण्यात येणार आहेत.
सदर कार्यशाळेत प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर एस आर चौधरी निवृत्त उपप्राचार्य डॉक्टर एस ओ माळी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरसाळेचे अध्यक्ष संजय रामचंद्र शिरोडे निवृत्त नगरपरिषद प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख युनियन बँकेचे शाखा अधिकारी मयूर पाटील शाहादा गोपीचंद नेरकर एपीआय मुंबई आरटीओ स्वप्निल वानखेडे बुलढाणा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक खेमचंद्र पाटील जळगांव प्रविण पवार चाळीसगांव प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी पाचोरा देविदास सावळे पाचोरा रवींद्र कुंभार जळगाव डीएसओ विनोद धनगर अमरावती एसटीआय संदीप पाटील जळगांव एसटीआय हर्षा साळुंखे जळगांव पीएसआय चांदणी पाटील पीएसआय शरद सैंदाणे गोंदिया पीएसआय भूषण पाटील गडचिरोली पीएसआय विशाल देवरे मुंबई पीएसआय संदीप भोई मुंबई पोलीस चंदन पाटील पीएसआय गोकुळ पाटील मुंबई पीएसआय शेखर बागुल मुंबई टॅक्स असिस्टंट पूजा वानखेडे जळगांव आर्मी ग्रुप चे सर्व सदस्य व पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक मंडळ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यशाळा पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय (टाऊन हॉल)अमळनेर या ठिकाणी सकाळी ८.०० दुपारी १.०० या वेळेत होईल विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी दिनांक ६ मे पर्यंत 7020432816 या मोबाईल वर किंवा 8007535093 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *