1 min read

राजकारण झांगडगुत्ता

Loading

राजकारण झांगडगुत्ता

हल्लीचे राजकारण असे आहे
कोणाला न कळणारा झांगडगुत्ता
कोणाच्या मनात काय चाललंय?
याचा जनतेला न लागे थांगपत्ता

बिकट परिस्थितीत नायक पवार
नवी राजकीय आखणी करतात
नडलेल्या अडलेल्याचा इथे ते
मग पध्दतशीर काटा काढतात.

पाॅवरफूल राजकारणातले ते,
त्यांनी कित्येक गेम फिरविले
गुगली ही न उमगली कोणा,
असे येति शरण भलेभले

परिस्थिती कोणतीही ते
न डगमगता लढत राहिले
ईडीवर चालून गेले,
कित्येक डाव उधळले,
पावसात चिंब भिजले
मात्र अशक्य ते शक्य केले

या देशाच चित्र बदलणार
याचेही भान लगेच ओळखले
महाराष्ट्राच्या हिताचं सांगून
उध्दवजी सेनेला जवळ केले.

बलाढ्याला दूर सारून
सरकार त्यांनी स्थापन केले.
ठाकरेंना मुख्यमंत्री केले
पवार सरकारचे पालक झाले

त्यांच्या सोबत जे आले
त्यांनाही मजबूत केले
राजकारणातले अभ्यासक्रम’
पवार पाॅवरफूल नायक झाले

नको मविआमध्ये आता फूट
परिवर्तनाची उसळू द्या लाट
बांधा नवा चंग,मजबूत वज्रमूठ. लोकशाही नांदू द्या, रहा एकजुट

शिवराय- फुले-शाहू-आंबेडकरांचे
विचार तुमच्या आहेत संगती
जनतेप्रति तुमची सहानुभूती
म्हणूनचं ‘लोक तुमचे सांगाती’ *

कवी अजय भामरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *