अंतर्मनातल्या आठवणीतले तात्यासाहेब विलासराव पाटील
![]()

अंतर्मनातल्या आठवणीतले तात्यासाहेब विलासराव पाटील
ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे देवगांव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष तात्यासौ विलासरावजी पाटील…
धैर्य, अविरत मेहनत, सत्यता, कमालीची बुद्धिमत्ता, ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा, या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव ,कोणत्याही परिस्थितीत हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्व या परमेश्वराने बहाल केलेल्या अनमोल गुणांचे तेजोमय व्यक्तिमत्व म्हणजे तात्यासाहेब….
विलासराव पाटील यांच्या घरातील वातावरण शैक्षणिक होते, आई मंदाकिनी पाटील हया राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या होत्या.. आई वडीलांकडून सरांना शिस्तीचे धडे भेटले. सरांच्या घरातील सर्वच सदस्य प्रेमळ आहेत.
2011 मध्ये आपल्या देशात जनगणना अभियान राबवण्यात आले त्यावेळेस या जनगनणेत स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे यासाठी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील यांनी जनजागृती केली. संघटनेच्या वतीने पंतप्रधानांना 5000 पोस्ट कार्ड लिहून पाठवले.
धुळे जिल्ह्यातील नंदुरबार जिल्हा वेगळा झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातील एसटी बांधवांचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात कमी करून ओबीसींना 19 टक्के आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले.
उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना 27% आरक्षण जाहीर केले होते परंतु काही आरक्षण विरोधी लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली होती यासाठी आपल्या संस्थेतर्फे 11 एप्रिल 2008 रोजी ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ओबीसी विद्यार्थ्यांचे आरक्षणाच्या समर्थनासाठी सह्यांची मोहीम राबवली व त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला व विद्यार्थ्यांना पूर्वरत 27% आरक्षण मिळाले. अ.भा.माळी महासंघाच्या वतीने वधू वर परिचय मेळावा, रक्तगट तपासणी शिबिर ,वृक्षारोपण, थोर पुरुषांच्या जयंती या पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यान त्यांनी आयोजित केले.
धुळे जिल्हा परीक्षेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने 2009 मध्ये बिंदू नामावली तयार केली होती ती अत्यंत चुकीची होती याची माहिती मिळाल्यानंतर विलासराव पाटील सर यांनी हा घोटाळा उजेडात आणला या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदला त्याची दखल घ्यावी लागली व दहा वर्षापासून बंद असलेली ओबीसी भरती सुरू झाली.
28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी केली व संस्थेतर्फे प्रतिवर्षी या दिनानिमित्ताने खानदेश स्तरीय गुणवंत शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. खानदेशातून आजतागायत 2000 शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ओबीसी महामंडळातर्फे शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातून 700 विद्यार्थ्यांना लाभ झाला.
महात्मा फुले यांना आपले आदर्श मानून देवगांव देवळी सारख्या छोट्याशा गावात सातवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था होती. आदर्श शिक्षक, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी बापूसाहेब एस.एल पाटील यांची गावात शाळा असावी अशी मनीषा होती.. ती मनीषा विलासराव पाटील यांनी सत्यात उतरवली..
पुढचे शिक्षण नसल्याने अनेक विद्यार्थी शाळा शिकू शकत नव्हते. गरज ओळखून विलासराव पाटील यांनी देवगाव देवळी सारख्या गावात महात्मा फुले यांच्या नावाने दहावीपर्यंत शाळा सुरू करून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत .शाळेत तळागाळातील समाजातील गुणवंत शिक्षकांना प्राधान्य देत त्यांना नोकरी दिली.
आज शाळा अमळनेर तालुक्यात उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. 24 वर्षात शाळेने गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. शाळेमध्ये दरवर्षी विद्यार्थी, शिक्षकांना निरोप समारंभ प्रसंगी ते मार्गदर्शन करत असतात.
विलासराव पाटील हे अनेक पदांवर कार्यरत आहेत शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे ते देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे चेअरमन आहेत व संस्थेचे ते अध्यक्ष आहेत, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याच्या माध्यमातून समाजाचे संघटन वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे ते देवगांव देवळी येथे सावित्रीबाई फुले वाचनालय सुरू करून वाचन संस्कृती टिकवली आहे. ओबीसी शिक्षक असोसिएशनचे ते राज्य अध्यक्ष आहेत. शिक्षक पतपेढीत संचालक ते उपसभापती म्हणूनही काम पाहिले आहे. ते उत्कृष्ट वक्ते आहेत त्यांनी अनेक विषयांवर आपलं व्याख्यान दिलेले आहेत.
३ मे हा त्यांचा ६० वा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यासाठी दोन ओळी…
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
शुभेच्छुक
श्री ईश्वर आर महाजन
उपशिक्षक
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव ता अमळनेर जि. जळगाव भ्रमणध्वनी 98 60 35 29 60


