1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा
अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे मा.खा. शरद पवारांना पत्र

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा

अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे मा.खा. शरद पवारांना पत्र

अमळनेर प्रतिनिधी
उपरोक्त विषयान्वये, आज आपण “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमावेळी
आपल्या भाषणादरम्यान आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केलात. गेल्या 6-7 दशकांपासून राजकीय कारकिर्दीत आपण विविध पदे भुषविली आहे. त्यात प्रामुख्याने
महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, उद्योग मंत्री तसेच दि. 10/06/1999 ते
आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. गेल्या 60 वर्षातील आपले सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आपले योगदान संपूर्ण देशाने बघीतले आहे तसेच महाराष्ट्र राज्य व देशहिताचे
असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत, हे संपूर्ण देश विसरू शकणार नाही. आज आपण अचानक घेतलेला
निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशाला राजकीय धक्का देणारा आहे, त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य
कार्यकर्ता जो आपल्या पक्षाच्या विचारधारेवर व आपल्या नावाच्या ताकदीवर सन 2019-24 सार्वत्रिक
विधानसभा निवडणूकीत आमदार म्हणून निवडून आलो. परंतु, आपण घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह लाखोकार्यकर्ते खचून गेले आहेत.
तरी, आदरणीय साहेब, आज आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्तीबाबतचा घेतलेला निर्णय मागे
घ्यावा अन्यथा मला माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा मा. विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याची परवानगी द्यावी असे पत्राद्वारेआ. अनिल भाईदास पाटील)
मुख्य प्रतोद, विधानसभा यांनी मा.खा.पवारसाहेब यांना पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *