1 min read

पालखी सोहळयाने सप्ताहाची सांगता
अतनूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Loading

पालखी सोहळयाने सप्ताहाची सांगता
अतनूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अतनूर / प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री.काशी विश्वनाथ महाराज मंदीरात व संजीवन समाधी घेणारे श्री.संत घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १४७ व्या. पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असून यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार यांचे किर्तन व गाथा पारायण, दुपारी कथेचे आयोजन करण्यात आलेले होते. या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी सकाळी पहाटे संपुर्ण गावभर पालखी वीना, महिलांच्या डोक्यावर तुलसी पात्र कळस, फुगडी खेळ, टाळ, मृदृंगाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अतनूर येथील मंदिरात २१ ते २८ एप्रिल या कालावधीत कीर्तनसेवा, सकाळी ६ ते ७ श्री.घाळेप्पा स्वामी यांचा रुद्राभिषेक, सकाळी ७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १०ते १२ गाथ्यावरील भजन, दुपारी २ ते ४ भागवत कथा, तसेच हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर, पहाटे काकडा आरती सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.गौरीताई सांगळे, ह.भ.प.संतोष पवार, ह.भ.प.बाळासाहेब शिंदे जालनाकर, ह.भ.प.सौ.आशाताई राऊत, ह.भ.प.कु.शिवलीलाताई पाटील, ह.भ.प.राजेश गुंजरगेकर, दुपारी गुलालाचे कीर्तन ह.भ.प.विश्वनाथ महाराज अतनूरकर, रात्री ह.भ.प.सुरेंद्र महाराज गुराळकर,
शुक्रवारी श्री.संत महंत एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती श्री.संत नामदेव महाराज संस्थान उम्ररज बोरी यांच्यासह ह.भ.प.विश्वनाथ स्वामी महाराज, ह.भ.प.दयानंद स्वामी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला.
चौकट …….
मागील सात दिवसांपासून अतनुरात भक्तिमय वातावारण होते. गुरुवार रोजी भंडारा-महाप्रसाद झाला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पालखी मिरवणूक काढण्यात आली. सोबतच फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. गावातील महिलांनी घरासमोर रांगोळी काढुन पालखी मिरवणुकीचे स्वागत केले. टाळ, मृदृंगाच्या जयघोषात गावकरी, माहेरवाशीनीसह महाराष्ट्र-आंध्रप्रदेश-कर्नाटक-तेलंगना सरहद्द राज्याच्या राज्यअंतर्गत तसेच लातूर-नांदेड सरहद्द सीमावर्ती भागातील भाविक भक्त मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे, भाजपा अनुसुचित जातीजमातीचे प्रदेशअध्यक्ष माजी आ.सुधाकर भालेराव यांनी सप्ताहात सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विकासराव सोमुसे-पाटील, उपाध्यक्ष बाबूराव कापसे, सचिव बाबूराव पंचगल्ले, मुख्य सल्लागार माजी सभापती अशोकराव पाटील, गोविंदराव येवरे-पाटील, दयानंद स्वामी, दिलीप कोकणे, पोलीस पाटील प्रकाश पाटील, किशन मुगदळे, सुर्यकांत पांचाळ, ईश्वर कुलकर्णी, राम रेड्डी, मारोती गुंडीले, नामदेव कोकणे, बाळु महाराज‎, सरपंच चंद्रशेखर पाटील, दिलीपराव पाटील, ग्रा.प.सदस्य साहेबराव पाटील, विजय पाटील, ग्राहक संरक्षण समितीचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बी.जी.शिंदे अतनूरकर, गोविंद कोकणे, प्रकाश सोमुसे गुरूजी, बालाजी पाटील, राजेंद्र पाटील, प्रमोद संगेवार, विठ्ठल बारसुळे, चंद्रकांत जोशी, गोविंद बारसुळे, चंदर पाटील, साहेबराव येवरे-पाटील, कैलास सोमुसे-पाटील, विठ्ठल संगेवार, सुर्यकांत बोडेवार, गव्हाणे-पाटील, येवरे-पाटील, सोमुसे-पाटील, शिंदे-पाटील, कापडे, तेलंगे, गायकवाड, वाघमारे, मुंजेवार, मनियार, कासार, बाबर तसेच यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सेवेकरी आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *