1 min read

माणुसकीची प्रेरणा देणारा खरा साथी,सेवानिवृत्त प्राचार्य एल.जे.चौधरी

Loading

माणुसकीची प्रेरणा देणारा खरा साथी….सेवानिवृत्त प्राचार्य बापूसौ एल.जे.चौधरी..

ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा, व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मा. प्राचार्य एल.जे चौधरी सर
धैर्य ,अविरत मेहनत ,सत्यता, कमालीची बुद्धिमत्ता, ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा, मितभाषी व्यक्तिमत्व, या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव, कोणत्याही परिस्थितीत हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्व या परमेश्वराने बहाल केलेल्या अनमोल गुणांचे तेजोमय व्यक्तिमत्त्व म्हणजे चौधरी सर…..
सु.व्हि मुंदडे हायस्कूल मारवड ता. अमळनेर या विद्यालयात कार्यरत असले श्री लोटन जगन्नाथ चौधरी उर्फ बापूसौ एल जे चौधरी हे आपल्या प्रदिर्घ सेवेतून 30 एप्रिल 2023 रोजी सेवेतून निवृत्त झाले. श्री एल.जे चौधरी सर यांनी 31 वर्षे 6 महिने अशी सेवा केली. त्यातून 4 वर्ष 5 महिने प्राचार्य पदावर सेवा केली व 26 वर्ष उपशिक्षक पदावर कार्यरत होते. न्यू इंग्लिश स्कूल प्र.डांगरी व सु.व्हि मुंदडे हायस्कूल मारवढ या विद्यालयात शिक्षक पदावर काम करत असतांना गणित व विज्ञान या विषयाचे अध्यापन केले. त्यांचे विद्यार्थी आजही वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. शिक्षक पदावर काम करत असतांना परीक्षक तसेच अमरावती बोर्डात पेपर सेटर म्हणून काम केले. सु.व्हि मंडळ हायस्कूल मारवड या विद्यालयात प्राचार्य पदावर प्रशासकीय काम करतांना संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, व विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इयत्ता बारावीचे सतत पाच वर्षे केंद्र संचालक म्हणून उत्कृष्ट काम केले.
सामाजिक काम करत असतांना तेली समाज पंचमंडळ मारवाड येथे अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत त्या कालखंडात मा.आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या आमदार निधीतून समाज मंदिर उभारले गेले. तसेच तालुका स्तरावर राज्यस्तरी वधु वर पालक परिचय मेळाव्यात सचिवपद सांभाळून मेळावा संपन्न केला तसेच जळगाव जिल्ह्यातील तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ जळगांव येथे विश्वस्त पदावर काम करत असतांना समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा तसेच राज्यस्तरीय वधुवर पालक मेळाव्यात सहभाग नोंदवला .तसेच पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढी अमळनेर येथे व्हाईस चेअरमन पदावर काम करून तत्कालीन संचालक मंडळास सहकार्य केले व शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पतपेढीस प्रगती पथावर आणण्यास सहकार्य केले. बहुउद्देशीय सार्वजनिक वाचनालय मारवड येथे संचालक पदावर कार्यरत आहेत त्या माध्यमातून गावात विद्यार्थी तसेच ग्रामस्थांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली.
संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर येथे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. अमळनेर ते शेगांव पायी वारी सतत 9 वर्ष सहभाग नोंदवला त्या माध्यमातून मंदिरावर वर्षभर होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमात संस्थांनचे अध्यक्ष व मार्गदर्शक आप्पासाहेब प्रा. आर.बी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम यशस्वी केले..
आज जरी आपणास निवृत्तीचा निरोप देण्यात येत असला तरी आपण सर्वांच्या मनातून निवृत्त होणार नाहीत.. याप्रसंगी मी माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो. माझ्या आयुष्यातील काही क्षण आपल्या वाट्याला येवोत हीच संत गजानन चरणी प्रार्थना, आनंदी राहा, दीर्घायुषी व्हा..!

शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन
मुख्यसंपादक
मराठी लाईव्ह न्युज
राज्य कार्यकारणी सदस्य
महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई

जाहिरात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *