कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा.
शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीला कौल -आमदार अनिल पाटील
![]()



कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा.
शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीला कौल -आमदार अनिल पाटील
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी व भाजपमध्ये काट्याची टक्कर होती. महाविकासा आघाडीने आपले वर्चस्व राखत भाजपला कात्रजच्या घाट दाखवला..
सविस्तर माहिती अशी कि अमळनेर बाजार समितीत महाविकास आघाडी ११ भाजप ४ , अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत अपक्ष उमेदवारांनी पाठीबा दिला आहे असे आमदार अनिल पाटील यानी सांगितले. तिन्ही अपक्ष उमेदवारांनी मविआला पाठिंबा दिला असून मविआने अमळनेर बाजार समितीत १४ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
अमळनेर बाजार समितीचा निकाल खालीलप्रमाणे
ग्रामपंचायत मतदार संघ
१) स्मिताताई वाघ- 726
२) अशोक आधार पाटील-721
३) सुभाष पाटील-656
४) सुरेश पाटील- 507
५) अशोक हिंमतराव पा.-421
६) नितीन बापूराव-409
७) भोजमल पाटील-394
सोसायटी मतदारसंघात विजयी…
१) सुषमा देसले – 634
२) पुष्पा पाटील – 593
विजयी…
सेवा सहकारी वि जा भ ज मतदार संघ
१)समाधान धनगर – 603 विजयी
इतर मागास वर्गीय मतदार संघ
१) डॉ अनिल शिंदे – 722
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ*
१) प्रफुल्ल पाटील – 506
२) सचिन पाटील – 510
ग्राप आर्थिक दुर्बल मतदार संघ
१)हिरालाल पाटील – 481
ग्राप अनुसूचित जाती जमाती मतदार संघ
१) भाईदास भिल – 43
हमाल मापाडी मतदार संघ
१) शरद पाटील – 195
म्हणजे महाविकास आघाडी 11 भाजपा 4,अपक्ष 1 अशा जागा निवडणूक आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर आर पाटील यांनी काम पाहिले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अधिक जागा आल्यामुळे व अपक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे सभापती पदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेऊन बाजार समितीच्या कामात पारदर्शकपणा यावा अशी विजयी उमेदवारांकडून अपेक्षा आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.





