1 min read

सातपुड्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धे येथील सुपुत्र मनिलाल शिंपी यांची अभिमानास्पद यशस्वी वाटचाल, डॉ.मनिलाल शिंपी यांची मां.भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा सल्लागार समितीमध्ये निवड . महाराष्ट्राचा सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव! माझ्या कार्याची दखल घेणार्‍या विद्यापीठ कमिटीचे मनापासून आभार!

Loading

सातपुड्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धे येथील सुपुत्र मनिलाल शिंपी यांची अभिमानास्पद यशस्वी वाटचाल, डॉ.मनिलाल शिंपी यांची मां.भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा सल्लागार समितीमध्ये निवड . महाराष्ट्राचा सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव! माझ्या कार्याची दखल घेणार्‍या विद्यापीठ कमिटीचे मनापासून आभार!

मुंबई,ठाणे ( प्रतिनिधी ) सातपुडा सारख्या आदिवासी दुर्गम भागातील नंदुरबार जिल्ह्य शहादा तालुक्यातील परिवर्धे येथील सुपुत्राला मध्यप्रदेशातील विद्यापीठात मानाचे स्थान प्राप्त झाले असून नंदुरबार जिल्ह्यातील सर्वांना मनिलाल शिंपी यांचा कार्याबाबत अभिमान आणि गर्व आहे.
मध्यप्रदेश राज्यातील मां. भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी च्या सल्लागार समिती सदस्य म्हणून डॉ.श्री.मणिलाल रतिलाल शिंपी यांनी मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, आर.एस.पी.अधिकारी म्हणून जे उल्लेखनीय कार्य केले, व त्यामुळे सर्व समाज बांधवांमध्ये आर.एस.पी.ची प्रतिमा उंचावली, तसेच भारतामध्ये देखिल आर.एस.पी.बद्दल एक नव चैतन्य निर्माण करून दिले, या सर्व कार्याची दखल घेऊन डॉ.श्री.मणिलाल शिंपी यांची भारतीय विद्यापीठ नियमानुसार मध्यप्रदेशातील मां. भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चा (Honorary advisory director) सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली असे नुकत्याच झालेल्या विद्यापीठ कार्यकारिणीचा बैठकीमध्ये सर्वानुमते जाहीर केले. श्री .मनिलाल शिंपी यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व समाजसेवा हे व्रत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता सुरक्षा दल (आर.एस.पी.)साठी कोणत्याही प्रकारची जीवाची परवा न करता,मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत गरजू लोकांना अन्नधान्य पासून तर औषधे घरपोच पोहचविण्या पर्यंत तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पासून ते गणवेश हि कसे देता येतील यासाठी विशेष परिश्रम घेतले त्याच प्रमाणे त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत उपलब्ध करून दिली. त्या मध्ये दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक शासकीय पत्रकार तथा स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.श्री.दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक, उद्योजक डॉ. रामचंद्र देसले,डोंबिवली मॅनिफॅक्चर असोसिएशन , कच्छ युवक संघ, रोटी डे ग्रुप, समाजसेवक, दानशूर व्यक्ती, अशा बहुसंख्य संस्थांच्या माध्यमातून आमचे जीवन समाज सेवेसाठी हे ब्रीद वाक्य समोर ठेवून निस्वार्थपणे आजतागायत काम करीत आहेत. व आर.एस.पी. या विषयाचे महत्त्व शिक्षण विभाग, पोलीस विभाग, यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहचहुन समाजामध्ये आर.एस.पी.बदल आदर निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सन्माननीय भगतसिंग कोश्यारी यांनी कल्याण-डोंबिवली आर. एस.पी.अधिकारी युनिट च्या अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून समाजसेवा गौरवरत्न म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले. मला विद्यापीठाचे सल्लागार समितीमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली. महाराष्ट्रातून जबाबदारी देण्यात आल्यामुळे मी सर्व एम.बी आय.युनिव्हर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष भार्गव यांचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे आपण जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही असे मी आपणास जाहीर आश्वासन देत आहे. असे यावेळी एम.बी.आय. युनिव्हर्सिटी चे नवनियुक्त सल्लागार समिती सदस्य डॉ. श्री मणिलाल शिंपी यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *