1 min read

सु.हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे सेवापुर्ती सोहळा संपन्न

Loading

सु हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे सेवापुर्ती सोहळा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी – मारवड येथील सु हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथील मुख्याध्यापक श्री एल. जे. चौधरी , जी. ए. साळुंखे व ए. बी. शिंदे सर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर सत्कारार्थी तसेच जेष्ठ शिक्षक एन. पी. सनेर होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एन. पी. सनेर यांनी भूषविले. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बागुल यांनी केले तर सूत्रसंचालन प्रितम सोनवणे यांनी केले. सत्कार सोहळ्यात तिघेही सत्कारमूर्ती यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या मनोगतात सत्कारार्थीचा जीवनपट, त्यांनी शाळेसाठी केलेले कार्य, चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी केलेले कार्य याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यापनासोबत समाजात स्थानिक पातळीवर केलेले सामाजिक कार्य याविषयीही त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी संजय सैंदाणे, एस. आर.बागुल, एन. वाय. साळुंखे, सचिन साळुंखे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *