1 min read

जि.प.प्राथमिक शाळा जळकेतांडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक संपन्न

Loading

जि.प.प्राथमिक शाळा जळकेतांडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळकेतांडा ता.जि.जळगाव येथे आज शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एकचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास मा.कैलास पवार केंद्रप्रमुख शिरसोली तथा मा.भंगू चव्हाण अध्यक्ष शा.व्य.स.मा.सुरेश चव्हाण उपाध्यक्ष शा.व्य.स.मा.दूर्गा तंवर,मा.माया चव्हाण शा.व्य.स.सदस्य तथा मा,सौ.गीताबाई राठोड ग्रा.प.सदस्य,श्रीम.कमलबाई चव्हाण अंगणवाडी सेविका,सौ.सोनार अंगणवाडी मदतनिस व गावातील नवागत बालके, मातापालक,व नागरिक उपस्थित होते.प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन वनमाला हातकर यांनी केले.मेळाव्याचे फित कापून उद्यघाटन सौ,गीताबाई राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.तर सरस्वती मातेचे पुजन व पुष्पहार अर्पण मा.श्री.कैलास पवार यांनी केले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फूलेंच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण मा.भंगू चव्हाण यांनी केले.नवागतांचे स्वागत औक्षण व हार घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेच्यावतीने करण्यात आला.यानंतर सातही स्टाॕलवरिल क्रिया नवागतांनी केल्या सेल्फी पाॕईंटवरही फोटो घेण्यात आले,नंतर नवागतांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले.व त्यांना शाळापूर्व तयारी पुस्तिकेचे वाटप करून खाऊ देण्यात आला.आभार श्रीमती वनमाला हातकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *