1 min read

अमळनेर शहरात एका रात्री दोन ठिकाणी घरफोडी , भुरटया चोरांचा बंदोबस्त व्हावा स्थानिक नागरिकांची मागणी..

Loading


अमळनेर शहरात एका रात्री दोन ठिकाणी घरफोडी —-

अमळनेर—– येथील मुंदडा नगर एक जवळील कस्तुराबाग व सोनार नगर येथील भागात आज ता.28 रोजी रात्री दोन ठिकाणी घरफोडया झाल्याची घटना घडली.
कस्तुराबाग येथील रहिवासी नितेश रोहिदास पाटील (एस टी वाहक ) यांच्या घराच्या कडी कोंडा तोडून चोरांनी कपाटातील कापडे असताव्यस्त करुण नुकसान केले आहे.मात्र रोकड, सोने काहीही चोरीला गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. यांच्याच घराच्या बाजूलाच लावन्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरेत चोर हे रात्री 3.45 वाजता (पावणे चार ) घराचे कडी कोंडा तोडून घरातील साहित्याचे नुकसान केले. तर सोनारनगर येथील श्रीमती कल्पना सूर्यवंशी यांच्याही घराचे कडी कोंडा तोडले मात्र काहीही चोरी न झाल्याचे त्यांनी सांगितले. काल ता.27 रोजी ही अमळनेर शहरात भर दिवसा चोरी झाली होती. शहरात पुन्हा चोरीचे प्रमाण वाढले असून परिणामी पोलिसांनी लक्ष घालून रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *