1 min read

निंभोरे येथे २१ वर्षानंतर आले विद्यार्थी – शिक्षक एकत्र !…

Loading

निंभोरे येथे २१ वर्षानंतर आले विद्यार्थी – शिक्षक एकत्र !…

विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिले टायटनच्या घड्याळी भेट !…

जि.प.शाळा निंभोरा येथे तब्बल २१ वर्षांनंतर भरली शाळा !…

धरणगाव प्रतिनिधी -पी डी पाटील सर

धरणगाव – तालुक्यातील निंभोरे येथील विद्यार्थी व शिक्षक गेट-टुगेदर च्या माध्यमाने तब्बल २१ वर्षांनी एकत्र आले.२००२ च्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपणांस घडविणाऱ्या श्री.संजय गायकवाड व श्री.सतीश राजपूत या आपल्या शिक्षकांविषयी मनोगतातून भरभरून गौरोदगार काढले. शिक्षकांनाही आपले सर्वच विद्यार्थी वेल सेट असल्याने आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या सरांना प्रेमाचे प्रतिक म्हणून टायटनच्या ३२०० रुपये किमतीच्या घड्याळी भेट दिल्या. सर्व विद्यार्थी आपल्या शाळेचे जुन्या आठवणींमध्ये रममान झाले. शिक्षकांची मनसोक्त संवाद केला. एकमेकांची हितगुज केले. २१ वर्षानंतर ची ही भेट ऐतिहासिक भेट सर्व मित्रांची व शिक्षकांची झाली याचा सर्वांना सार्थ अभिमान व आनंद वाटला. या जिप शाळेने आम्हाला खूप काही दिले या शिक्षकांच्या संस्कारातून आम्ही घडलो आणि आज मित्र विविध ठिकाणी शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहोत आम्हाला शिक्षकांचा व आमच्या शाळेचा अभिमान आहे. आमच्यावर आमच्या शाळेने चांगले संस्कार घडविले म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो असे प्रतिपादन सर्वच माजी विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी तर आभारप्रदर्शन सुवर्णा पाटील यानी केले. कार्यक्रमानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रमोद सोनवणे,स्वति शिसोदे, राहुल पाटील, मीनाक्षी पाटील, सायली पाटील, सविता पाटील, मालू पाटील, सुलोचना कोळी या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *