अमळनेरला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरासरी मतदान 98.87
अनेक उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन…
विदयामान व माजी आमदारांची प्रतिष्ठा पनाला
![]()



अमळनेरला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरासरी मतदान 98.87
अनेक उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन…
विदयामान व माजी आमदारांची प्रतिष्ठा पनाला
अमळनेर प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर ची निवडणूक विद्यमान आमदार व माजी आमदार यांची प्रतिष्ठेची बनली आहे. ग्रामपंचायत व विकास सोसायटीच्या मतदारांना उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन केल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली असे बोलले जात आहे..
अमळनेर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन पॅनल तयार करण्यात आली होती तिन्ही पॅनलमध्ये विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यामध्ये काट्याची टक्कर होती व यासाठी अनेक मिळावे व प्रचार करण्यात आला शेवटच्या दिवशी प्रत्येक मतदाराला दोन्ही पॅनल कडून लक्ष्मीची मोठ्या प्रमाणात दर्शन झाले पण कोणाचा निवडणुकीत विजय होईल त्याच्याकडे लक्ष लागले आहे. कोणत्याही पॅनलला पूर्ण बहुमत मिळणार नाही. प्रत्येक पॅनल मधून काही उमेदवार निवडून येतील. शेवटी पॅनलचा प्रचार प्रसार न करता एकला रे चला अशी उमेदवारांनी भूमिका घेतल्यामुळे व मतदारांनी कोणाला मतदान केलं याच्यावर सगळे यश अपयश अवलंबून आहे..
अमळनेरला आज जी.एस हायस्कूलमध्ये मतदान अत्यंत शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडले. सोसायटी मतदारात 1229 पैकी 1117 मतदान झाले ते सरासरी 98.93 झाले तर ग्रामपंचायत 1015 पैकी 1003 मतदान झाले तर सरासरी 98.81 मतदान टक्केवारी मतदान झाली तर हमाल मापाडी 344 पैकी 340 मतदान झाले ते 98.83 सरासरी मतदान झाले तर एकूण अमळनेर तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरासरी मतदान 98.87% इतकी झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी आर आर पाटील यांनी काम पाहिले व अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांचे सहकारी बांधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला निवडणुकीमध्ये मुळे स्वामी समर्थ भेटते जीएस हायस्कूल चा रस्ता ट्राफिक जाम झाला होता व मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचे समर्थक गर्दी करून होते काही ठिकाणी पैसे वाटप तेही काम सुरू होते असे बोलले जात होते पण ही निवडणूक विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील माजी आमदार साहेबराव पाटील यांचे सहकार पॅनल तर दुसरे पॅनल माजी आमदार शिरीष चौधरी व मा.आ.स्मिता वाघ यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस होती . मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करतील याकडे लक्ष लागले आहे..
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर केला गेला अनेक मतदारांनाही मोठ्या प्रमाणावर पैशाच्या जोरावर मतदान विकत घेतले गेले .मोठ्या मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झाल्यामुळे दिवसभर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये चर्चा सुरू होती..
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव त्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक कुचंबना केली जाते व पैशाच्या जोरावर उमेदवार निवडून येतात पण शेतकऱ्यांचा वाली कोणी उरला नाही. फक्त पैशाच्या जोरावर सध्या तरी निवडणुका सुरू आहेत असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

