अमळनेरला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,
अनेक डेरेदार वृक्ष कोलमडून पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत…
![]()

अमळनेरला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अनेक डेरेदार वृक्ष कोलमडून पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत…
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात आज अवकाळी पावसामुळे अनेक डेरेदार वृक्ष पडल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली.. काही ठिकाणी वादळी वारासह गारपीट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली पण कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
अमळनेर तालुक्यात शेतकरी बांधव आपल्या शेतीतील काही कामे करीत असतांना पिंकाचे व चारा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अमळनेर निम रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ एक डेरेदार वृक्षाचे झाड पडल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी विजेचे पोल पडली आहेत. अनेक शाळांमध्ये सुद्धा झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अगोदरच अवकाळी पावसाने अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यात परत या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीट झाल्यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे…
अमळनेर तालुक्यातील नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..





