जिल्ह्यातील शिक्षकांच्या थकीत वैद्यकीय बिलांसह रजा रोखीकरणाचा प्रश्न अखेर सुटला
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागील चार वर्षापासून च्या प्रयत्नांना यश
![]()

जिल्ह्यातील शिक्षकांच्या थकीत वैद्यकीय बिलांसह रजा रोखीकरणाचा प्रश्न अखेर सुटला
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागील चार वर्षापासून च्या प्रयत्नांना यश
धुळे दि 25,
जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मेडिकल बिल तसेच रजा रोखीकरणाचे बिले या साठी अतिरिक्त बी डी एस उपलब्ध नसल्याने मागील गेल्या सुमारे तीन ते चार वर्षापासून प्रलंबित होते. त्यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेतर्फे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी सुरुवातीपासूनच मा शिक्षणाधिकारी तसेच, वेतन अधिक्षक यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. परंतु संबंधित कार्यालयाकडून नेहमीच असे उत्तर असायचे की आम्हाला जोपर्यंत शासनाकडून ऑफलाइन पद्धतीने बिल देण्यासाठी आदेश प्राप्त होत नाहीत, तसेच पगार बिला व्यतिरिक्त अतिरिक्त चा बीडीएस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमची इच्छा असून देखील आम्ही सदर शिक्षकांची थकीत बिले अदा करू शकत नाही. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर म्हणजेच शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक व मंत्रालय येथे पाठपुरावा करून ऑफलाइन पद्धतीने फरक बिले व मेडिकल बिले अदा करण्याबाबत आदेश आणावेत असे मा वेतन अधीक्षक यांच्याकडून सुचवण्यात आले. होते त्याप्रमाणे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेतर्फे या मेडिकल बिलांच्या रकमेसाठी तसेच फरक बिलांसाठी वरिष्ठ स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामध्ये तात्कालीन आयुक्त महाशय विशाल सोलंकी यांच्याकडे दिनांक 30 जून 2022 रोजी भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी मा संचालक पुणे यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. त्यानंतर दिनांक 17 मार्च 2023 रोजी मंत्रालय मुंबई येथे याविषयी उपसचिव शालेय शिक्षण विभाग श्री महाजन साहेब व श्री सावंत साहेब यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे दिनांक 3 एप्रिल रोजी , 11 एप्रिल रोजी व 24 एप्रिल रोजी या एकाच महिन्यात तीन वेळा या विषयावर माननीय शिक्षण संचालक श्री शरद गोसावी साहेब व संबंधित अधिकाऱ्यां कडे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी स्वतःसतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्न केले. कारण हा प्रश्न केवळ धुळे जिल्ह्याचा नसून धुळे ,जळगाव, नंदुरबार व अनेक जिल्ह्यांमध्ये याबाबत अडचणी निर्माण होत होत्या व हि बाब वेळोवेळी संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी संघटनेला सांगितली होती. मागील महिन्यात याच विषयावर जळगाव येथील शिक्षणाधिकारी सो यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी देखील सदरची बाब त्यांनी वरिष्ठ स्तरावरील असल्याचे सांगितले होते त्यामुळे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेतर्फे याबाबत जिल्हास्तरापासून ते थेट मंत्रालयापर्यंत अनेक वेळा पाठपुरावा करून तात्कालीन आयुक्त विशाल सोलंकी साहेब तसेच नवनियुक्त आयुक्त माननीय सूरज मांढरे साहेब यांच्याकडे देखील पहिल्याच भेटीत याविषयी मागणी करण्यात आली होती. तसेच शिक्षण उपसंचालक, संचालक, सचिव, उपसचिव यांच्याकडे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा व प्रयत्न केल्यामुळे शिक्षण विभागाकडून मेडिकल बिलांसाठी, रजा रोखीकरणासाठी अतिरिक्त बिडीएस उपलब्ध करून देण्यात आला तसेच सदरची बिले ऑफलाईन पद्धतीने देण्यास परवानगी मिळाल्यामुळे शिक्षकांचा मागील चार वर्षापासून प्रलंबित मेडिकल बिलांचा प्रश्न मार्गी लागला असून,हा प्रश्न केवळ एकाद्या पत्रकामुळे सुटलानसुन, मागील 4 वर्षाच्या सतत पाठपुराव्या चे हे यश आहे.त्यामुळे जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांना आभाराचे फोन येत असून शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

