1 min read

अडावद आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा.

Loading

अडावद आरोग्य केंद्रांत जागतिक हिवताप दिन साजरा.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप आजाराविषयी जनजागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने, वर्षाच्या प्रत्येक एप्रिल महिन्यात २५ तारखेला “जागतिक हिवताप दिन” साजरा करण्यात येत असतो.

एवढ्या एकच दिवस मलेरिया बाबत जनजागृती करून न थांबता संपूर्ण महिन्यात दिनांक- १ एप्रिल २०२३ ते दिनांक-३० एप्रिल २०२३ या दिवसामध्ये हिवताप जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येऊन हिवतापा विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करून, हिवताप प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणी, त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे जनते पर्यंत माहिती पुरविण्याचा प्रयत्न करणे,
हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

मा.डॉ.देवराम किसन लांडे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव/ जिल्हा हिवताप अधिकारी जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली, सम्पूर्ण जिल्ह्याभरात व
तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांच्या नेतृत्वाखाली सम्पूर्ण चोपडा तालुक्यात जागतीक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे.
अडावद प्रा.आ.केंद्राचे प्र.वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील, डॉ.अक्षय पाटील, सर्व CHO व सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून एप्रिल महिन्यात हिवताप आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.

आज त्याच अनुषंगाने चोपडा तालुका हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर व अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक-विजय देशमुख यांनी खेडीभोकरी येथे गावात प्रभातफेरी काढून, हस्तपत्रिका वाटप करून बस स्टँड परिसरात सभा घेतली,
ग्रामीण भागातील जनतेला हिवताप आजरा बाबत मार्गदर्शन केले.
त्यात हिवतापाचा प्रसार हा अँनाफेलीस या जातीच्या डासांमार्फ़त होतो, या जातीच्या डासांची मादी घरातील वापरण्यासाठीच्या साठवण्यात आलेल्या पाण्याच्या साठ्यामध्ये, स्वच्छ पाण्याची डबकी,नारळाच्या करवंट्या,जुने टायर्स इत्यादी वास्तूमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात व तेथे त्या अंड्यापासून नवीन डासाची उत्पत्ती होऊन अशा प्रकारे डासांची संख्येत वाढ होते व हिवतापाचा प्रसार हा वेगाने वाढ होत जाते.
डास उत्पत्ती थांबवण्यासाठी, प्रत्येकाने दर आठवड्याला एक दिवस कोरडा दिवस म्हणुन पाळला जावा,
१)ज्यात प्रत्येक घरातील साठवलेल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या, रांजण, सिमेंट हौद, इतर सर्व भांड्यातील पाणी एकसाथ रिकामी करून, ती स्वच्छ, घासून पुसून कोरडे करून मगच दुसऱ्या दिवशी त्यात पाणी भरावे, एवढेच नाही तर त्याला वरून कापडाने घट्ट बांधून ठेवावे, जेणे करून त्यात डास शिरणार नाहीत व अंडी घालणार नाहीत.
२) जी भांडी धुण्यासाठी अडचणीत असतील त्या ठिकाणी डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे टाकावेत.
३) झोपतांना
मच्छरदाणीचा वापर करावा,
४) डासांना पळवून लावण्यासाठी, मच्छर अगरबत्ती, अगरबत्ती, लिक्वीड, वडी पेटवावीत,
५) संडासच्या टाकीवरील एअर पाईपला वर जाळी बांधावी,
६) दार-खिडक्यांना देखील जाळ्या लावाव्यात व संध्याकाळी लवकर दार-खिडक्या बंद कराव्यात.
७) कुणालाही अंगात ताप सोबत थंडी वाजून आल्यास, मळमळ होत असल्यास, तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवताप निदानासाठी जावे व निदान झाल्यानंतर तात्काळ गृहीत समुळ उपचार घेतल्याने हिवताप पूर्णपणे बरा होतो.
वरीलप्रमाणे मार्गदर्शन आरोग्य सेवक- विजय देशमुख यांनी उपस्थित नागरिकांना केले.

प्रसंगी..
तालुका हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर, आरोग्य सेवक-विजय देशमुख, आशा सेविका-दिपाली कोळी,सुवर्णा सोनगीरे तथा सामाजिक कार्यकर्ते-राजेंद्र सोनगीरे, त्रिभुवन कोळी व इतर सर्व नागरिक उपस्थित होते.

शेवटी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार हे तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *