1 min read

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांचे सहकार्य अपेक्षित
डॉ अविनाश जोशी यांचे
अमळनेरला पत्रकार परिषदेत प्रतिपादन

Loading

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांचे सहकार्य अपेक्षित

डॉ अविनाश जोशी
अमळनेरला पत्रकार परिषदेत प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेरला मराठी वाड्मय मंडळात मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली. 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणार असल्याचा सर्वांना आनंद झाला. अमळनेर मध्ये दुसऱ्यांदा साहित्य संमेलन होणार याच्या अगोदर पहिले साहित्य संमेलन 1952 मध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते .त्यानंतर हा सन्मान अमळनेर तालुक्याला मिळालेला आहे यामध्ये सगळ्यांचे योगदान आहे ते साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य अपेक्षित आहे असे मंडळाचे अध्यक्ष डॉ जोशी त्यांनी सांगितले
प्रस्ताविक मंडळाचे सदस्य शरद सोनवणे यांनी केले.
मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी म्हणाले की
साहित्य संमेलनात स्वच्छता पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था, साहित्य संमेलनाला लागणारा खर्चासाठी निधी कसा उभा करायचा यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.
भोजन स्थळी पूर्ण स्वच्छता याची दक्षता घेणे ,डस्टबीनची व्यवस्था करणे, अधिवेशन ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे या विषयावर चर्चा झाली, तसेच मंडप उभारणीची व्यवस्था, भव्य दिव्य स्टेज,
आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था, राज्यातून येणाऱ्या पत्रकारांची व्यवस्था ,रसिकांची उपस्थिती,साहित्यिक, ग्रंथदिंडी ,ग्रंथ प्रदर्शन, स्टॉल धारकांना येणाऱ्या अडचणी त्यांना जागा व राहण्याची जागा उपलब्ध करून देणे ,पोलीस व प्रशासन यंत्रणा यांचे सहकार्य घेतले जाईल, साहित्य संमेलनाची जाहिरातीचे स्टिकर बस व इतर महत्त्वाच्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था केली जाईल , अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून संमेलन अत्यंत चांगले कसे होईल याचा विचार केला जाईल, यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन सूचना घेतल्या जातील,पाहुणे मंडळींना येण्यासाठी लागणाऱ्या गाड्या बस रेल्वे यासंदर्भामध्येही व्यवस्था केली जाईल. याबाबत वेगवेगळ्या विभागांची सविस्तर बोलणे सुरू आहे.अशाप्रकारे
विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळयाला हार वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व त्यांच्या सर्व कार्यकारणी मंडळांने व साहित्य क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिवादन केले.
यावेळा मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी उपाध्यक्ष श्यामकांत भदाने, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रम्हे नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे,कोषाध्यक्ष प्रदीप साळवी,सदस्य प्रा डॉ पी.बी भराटे, बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे,सौ वसुंधरा दशरथ लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा डॉ सुरेश महेश्वरी, प्रा श्याम पवार, प्रा शीला पाटील, श्रीमती रजनीताई केले,सह डॉ कुणाल मुरलीधर पवार, जिल्हाध्यक्ष खान्देश साहित्य संघ, जळगाव. श्रीम. सुनीता पाटील तालुकाध्यक्ष खान्देश साहित्य संघ, अमळनेर मनोहर नेरकर, रामकृष्ण बाविस्कर, दत्तात्रय सोनवणे, शरद पाटील, एडवोकेट लाठी, वाल्मीक मराठे,सौ पदमजा पाटील ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड,सौ गायकवाड मँडम सह साहित्यिक क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .शेवटी आभार प्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे यांनी मानले…