1 min read

कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेमार्फत मानवसेवा हीच ईश्वरसेवा गृपचा सन्मान!

Loading

कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेमार्फत मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा सन्मान!

ठाणे,कल्याण (प्रतिनिधी) राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रेरणेने विशेष स्वच्छता अभियान युनिट कल्याण पूर्व श्री मृत्युंजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली व मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख, डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षापासून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परिसरातील विविध सार्वजनिक शासकीय ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी संपूर्ण परिसराची स्वच्छता या युनिट मार्फत केली जाते. या टीमला कल्याण पूर्वचे लोकप्रिय आमदार श्री.गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त, वॉर्ड, आणि सफाई विभागातील कर्मचारी बंधू-भगिनींचे देखिल विशेष सहकार्य लाभत आहे. याच दरम्यान कल्याण जिल्हा न्यायालय परिसरात दिनांक १५ /४/२०२३ रोजी स्वच्छ भारत अभियान टीम मार्फत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. याबद्दल पूर्ण न्यायालयीन न्यायमूर्ती व न्यायाधीश तसेच कल्याण जिल्हा वकील संस्था अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी स्वच्छ भारत अभियान समितीचे अभिनंदन आणि कौतुक केले.व बार कौन्सिल च्या कार्यालया मध्ये सर्व वकील बंधू भगिनी यांच्या समोर स्वच्छ भारत अभियान चे प्रमूख मृत्युंजय शुक्ला व मानवसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख मनिलाल शिंपी यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी वकील संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रकाश जगताप, सचिव ॲड. चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील,सहसचिव ॲड.सुशील धनगर,सुरेश भगत,खजिनदार ॲड.अभिन गायकर, ॲड. क्रांतिकुमार रोठे,आणि ग्रंथपाल भारत पाटील , तसेच वारकरी संप्रदाय चे प्रमुख जगन्नाथ नेरकर,भीमाशंकर वारकरी भजनी मंडळ,गाडगे महाराज लॉन्ड्री असोसिएशनचे प्रमुख मनोज माळी, पतंजली योग संस्थेचे प्रमुख परमेश्वर जाधव उपस्थित होते,स्वच्छ भारत अभियान टीम कल्याण पूर्व,यांचे विशेष सहकार्य असून स्वच्छ भारत अभियान टीम ला.संपूर्ण समाजातून प्रेरणा मिळत आहे. समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा या ऊक्ती- प्रमाणे मानव सेवा ग्रुप संपूर्ण महाराष्ट्र भर काम करत आहे, याची दखल घेऊन कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेच्या वतीने ग्रुपचे प्रमुख आरएसपी कमांडर डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी,व श्री. मृत्युंजय शुक्ला यांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात आला, त्यामुळे कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे आभार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉक्टर श्री किशोर बळीराम पाटील व स्वामीनारायण ट्रस्टचे संचालक डॉक्टर श्री दिनेश भाई ठक्कर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *