1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रयत्नाला यश

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रयत्नाला यश

अनुदानापासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला असून जावक नंबर आणि अन्य अडचणी सोडवण्यासाठी आजचा शासन निर्णय जाहीर.

ठाणे ( मनिलाल शिंपी ):आवक-जावक क्रमांक नोंदवही उपलब्ध नसल्यामुळे अनुदानास अपात्र शिक्षकांना शिक्षणमंत्री मा.ना.श्री.केसरकर साहेब व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला न्याय.
शालेय शिक्षण सचिव मा.श्री.देओल साहेब व शिक्षण आयुक्त मा.श्री.मांढरे साहेबांचे राज्यातील शिक्षकांच्या वतीने मन:पुर्वक आभार.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचा यशस्वी पाठपुरावा.
कोणत्याही ११ कागदपत्रांपैकी पैकी कोणतीही ६ कागदपत्र आवश्यक. अनुदानाचा टप्पा वाढीचा मार्ग मोकळा.

मुंबई (२४) राज्यातील अघोषीत, २० व ४० टक्के अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा अनुदान मिळावे करीता शासनाने ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी च्या शासनाने अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या होत्या. यानुसार शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतांचे जावक क्रमांकाची तपासणी करून ते वैध आहेत वा नाही हे तपासून वाढीव टप्पा अनुदान वाढीचे आदेश देण्याचे निर्देश दिले होते.
मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचे जावक क्रमांक रजिस्टर कार्यालयात उपलब्ध न झाल्यामुळे शाळांना वाढीव टप्पा अनुदान आदेश देण्यात आले नव्हते. यामुळे हजारो शिक्षक वाढीव अनुदान पासून वंचित राहीले आहेत. याबाबत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.श्री.ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांच्या कडे राज्यातील शिक्षकांसह महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनिष गावंडे यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता विनंती केली होती.
याबाबत कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांनी पाठपुरावा करून अखेर आज शासनाकडून परीपत्रक निर्गमित करुन आणले आहे. यामुळे हजारो शिक्षकांशा न्याय मिळणार असून वाढीव टप्पा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा.ना.श्री.दिपकजी केसरकर साहेब, शालेय शिक्षण विभागाचे सचिव मा.श्री.देओल साहेब, शालेय शिक्षण आयुक्त श्री.मांढरे साहेब यांचे विशेष आभार व्यक्त करीत आहेत.अशी माहिती
मनिष गावंडे
राज्य अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना यांच्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *