शिक्षणाने स्त्रियांच्या प्रगतीच्या वाटा समृद्ध होतात
डॉ. मिलिंद बागुल
![]()

शिक्षणाने स्त्रियांच्या प्रगतीच्या वाटा समृद्ध होतात
डॉ. मिलिंद बागुल
भारतीय कुटुंब व्यवस्थेतील स्री ही कुटुंब व्यवस्थेचा कणा असून अनिष्ट रूढी, परंपरेच्या बाहेर पडण्यासाठी तिनं महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिक्षणाची विचार वाट स्वीकारत कुटुंब संस्थेत घडवून आणलेला बदल हा देशाला एका क्रांतीच्या दिशेने नेणारा ठरला असून शिक्षणाने स्त्रियांच्या जीवनातील प्रगतीच्या वाटा समृद्ध होत असल्याचे मत साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी को. ऑपरेटिव्ह ऑडिट क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वैशाली सोनवणे साळवे यांच्या व्ही.के. एंटरप्राइजेस कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले ते पुढे म्हणाले स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला अधिकाधिक महत्त्व देत आपल्या कुटुंब व्यवस्थेला प्रगत करण्यासाठी, विज्ञानवादी पिढी घडवण्यासाठी विज्ञानाचा दृष्टिकोन जोपासत आपल्या जीवनाची वाटचाल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे देखील त्यांनी मांडले. अध्यक्षस्थानी माजी सैनिक विजय देवराज होते. मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले लता बिऱ्हाडे यांनी बुद्ध वंदना त्रिशरण पंचशीलाने कार्यक्रमाची सुरुवात केली मान्यवरांचे स्वागत नानाभाऊ सोनवणे, विवेकानंद साळवे यांनी केले कार्यक्रमास पुनम निकम, शुभांगी देवराज, कमलबाई सोनवणे, आशा बागुल, सुरेखा वाडेकर, ज्योती भांडारकर, राजू निकम, शेख शरीफ शेख करीम, अनिस पटेल इ. मान्यवर उपस्थित होते.

