1 min read

अखेर अमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार..
साहित्यिक क्षेत्रात आनंदोत्सव

Loading

अखेर अमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार

सर्वच क्षेत्रातून व्यक्त केला आनंद…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे
स्थळनिवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे
उपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवारआणि डॉ. नरेंद्र पाठक हे सहभागी झाले होते.
या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. आणि सातारा येथील संस्थेचे दृक्-श्राव्य सादरीकरण पाहिले आणि तीनही संस्थांची संमेलन
आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने सर्वानुमते मराठी वाङमय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली.
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उपा तांबे यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समिती सदस्या व्यतिरिक्त प्रकाश पागे, प्रा.मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के.आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते.
डॉ. उज्वला मेहेंदळे कार्यवाह,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी यांनी अखेर घोषणा केली…
1984 ला 57 वे साहित्य संमेलन जळगांवला झाले होते. कित्येक वर्षानंतर जळगांव जिल्ह्यातील अमळनेरला साने गुरुजींच्या कर्मभूमीला हा मान मिळालेला आहे. वरील अ.भा मराठी साहित्य संमेलन 2024 ला जानेवारी महिन्यात होणार आहे. आतापासूनच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तयारीला अमळनेरला सर्व साहित्य क्षेत्रातील पदाधिकारी लागणार आहेत.यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचे योगदान,व मदत अपेक्षित राहील असे मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी सांगितले….
अमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी यांनी नुकतीच अमळनेरला येऊन पाहणी केली होती .आज पदाधिकाऱ्यांनी अमळनेरच्या निवडीबाबत घोषणा केली.याचे स्वागत व आनंद
डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर,व संचालक मंडळ,रमेश पवार, कार्याध्यक्ष मराठी साहित्य परिषद, अमळनेर, पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळ,डॉ कुणाल मुरलीधर पवार, जिल्हाध्यक्ष खान्देश साहित्य संघ, जळगाव, श्रीमती सुनीता पाटील तालुकाध्यक्ष खान्देश साहित्य संघ, अमळनेर मनोहर नेरकर, रामकृष्ण बाविस्कर, दत्तात्रय सोनवणे, शरद पाटील, उमेश काटे सह अनेक साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.