कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये म्हणून ‘शेतकरी शोषणमुक्ती पँनल’
पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांची माहिती
![]()

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये म्हणून शेतकरी शोषणमुक्ती पँनल….
पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांची माहिती
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक ‘गावराणी जागल्या सेना प्रेरित ‘शेतकरी शोषण मुक्ती पॅनल’ हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवत आहे असे आम आदमी पार्टीचे अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले..
आम आदमी पार्टीचे संतोष पाटील पुढे म्हणाले की मतदार माय-बाप हो, आपणासारख्या सर्वसामान्य वर्गवारीतील शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा व भोळेपणाचा फायदा घेऊन केले जाणारे आर्थिक व श्रमीक शोषण थांबवण्यासाठी अमळनेर बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणांगणात ‘गावरानी जागल्या सेना प्रेरीत’ पॅनल निवडणूक लढवीत आहे. सर्व उमेदवार हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लुटमार केली जाते, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, मालाची मोठ्या प्रमाणावर कट्टी केली जाते यासाठी हे शोषण थांबवायचे असेल बाजार समितीमध्ये योग्य पॅनलला शेतकरी बांधवांनी मतदान करणे गरजेचे आहे.
तर प्रा विश्वासराव पाटील अध्यक्ष गावरानी जागल्या सेना तथा पँनल प्रमुख यांनी सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समितीत आमचे पॅनल निवडणूक का लढवणार त्यांचा हेतू काय आहे ते खालीलप्रमाणे त्यांनी सांगितले…
शेतकरी शोषण मुक्ती पॅनलमार्फत बाजार समितीची निवडणूक लढण्याचा हेतू
गावरानी जागल्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्तरावरील पत्रव्यवहाद्वारे ज्या पद्धतीने प्रति क्विंटल एक किलो कट्टी थांबून शेतकऱ्यांना न्याय देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने बाजार समिती शेतमाल विकलेल्या शेतकऱ्याने प्लेट काट्यावरील शेतमालाच्या तोलाईची रक्कम स्वतः भरलेली असल्यास हिशोब पट्टीत पुनश्चत तोलाईची रक्कम कपात करण्याचा अन्याय थांबवण्यासाठी ..
कापूस शेतमालाचा लिलाव भुसार मालाप्रमाणेच खुल्या लिलाव पद्धतीने बोली बोलून खरेदी होणेसह कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीच्या नावाची परिशिष्ट 19 अनन्याची अधिकृत हिशोबपट्टी मिळण्यासाठी..
केवळ आर्थिक ताकदीच्या जोरावर मतदारांचे मत विकत घेऊन लोकशाही गिळंकृत करू पाहणाऱ्या भांडवलदारांना अट्टल घडवण्यासाठी आमची उमेदवारी आहे .
बाजार समितीत शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना विश्रांतीसाठी शेतकरी सदन तसेच पुरुष व महिलांसाठी सर्व सुविधायुक्त अद्यावत असे स्वच्छतागृह निर्मितीसाठी पॅनलच्या उमेदवारांची उमेदवारी आहे.
यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी शोषणमुक्ती पँननला प्रचंड बहुमताने निवडून सेवेची संधी द्यावी असे पत्रकार परिषदेत शेतकरी शोषणमुक्ती पँनल प्रमुख प्रा विश्वासराव पाटील यांनी सांगितले.
शेतकरी शोषण मुक्ती पॅनलच्या माध्यमातून अनेक विषयावर त्यांनी सविस्तर चर्चा करून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे प्रा. डॉ विलास पाटील यांनी केले.
यावेळी शेतकरी शोषण मुक्ती पॅनलचे सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रकांत जगदाळेसह पदाधिकारी उपस्थित होते.




