जिल्ह्यातील शाळा अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून तात्काळ संच मान्यता द्या!
शिवसेनेचे धुळे शिक्षण अधिकारी यांना निवेदन.
![]()


जिल्ह्यातील शाळा अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून तात्काळ संच मान्यता द्या!
शिवसेनेचे धुळे शिक्षण अधिकारी यांना निवेदन.
धुळे दि 21,
शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार राज्यातील अंशतः अनुदानित 20 टक्के 40 व 60 टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान देण्याबाबत अनेक अटी टाकण्यात आल्या होत्या. त्याची त्रुटी पूर्तता करण्यासाठी शासनाने आदेश दिलेले असताना , सन 2022 – 23 च्या संच मान्यता न मिळाल्याने जिल्ह्यातील सुमारे दहा-बारा शाळांवरील शिक्षकांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात काल शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख , शुभांगी ताई पाटील यांनी शिष्टमंडळासह जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मोहन देसले यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर निवेदन दिले. यामध्ये दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी माननीय आयुक्त शिक्षण यांनी शिक्षण उपसंचालक व जिल्हास्तरावर संच मान्यता देण्याबाबत पत्र काढलेले असताना देखील अद्याप धुळे जिल्ह्यातील सुमारे 10 ते 12 शाळांना शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडून संच मान्यता देण्याबाबत दिरंगाई करण्यात येत आहे. शासनाकडून या शाळांना दिनांक 30 एप्रिल पूर्वी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे व अशा परिस्थितीत संच मान्यता न मिळाल्यामुळे संच मान्यता अभावी या शाळांवरील विनाअनुदानित/अंशतः अनुदानित शिक्षकांना पगारापासून वंचित राहावे लागणार आहे. याची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेत तात्काळ या शाळांना संच मान्यता देण्यात येऊन त्यांचे पगार काढण्यात यावे. तसेच माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याबरोबर जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.ज्या मध्ये प्रामुख्याने मेडिकल बिल, रेगुलर पगार, फरक बिल या सर्वांबाबत चर्चा करून काय मार्ग काढता येईल यावर चर्चा केली. मेडिकल बिल साठी मंजुरी मिळाली असून नावे पण आलेत. पण बी डी एस नसल्यामुळे पैसे टाकता येत नाहीत. यावर शुभांगी ताई यांनी सांगितले की वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून नक्कीच बी डी एस काढण्याचा प्रयत्न करते असे सांगितले, या सर्व प्रश्नां बाबत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्या अध्यक्ष तथा शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी सविस्तर निवेदन दिले. याप्रसंगी शिष्टमंडळात श्री अरविंद पाटील सर, श्री डी जी मोरे सर, श्री एन ए पवार सर ,श्री राजकिरण गवळे सर, श्री भटू राजे सर, श्री ए डी खैरनार सर, श्री ए डी सोनार सर तसेच अनुदानापासून वंचित असलेल्या अनेक शिक्षक शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होते.

