1 min read

जळोद जिल्हा परिषद शाळेत खाऊचे पैसे वाचवत विद्यार्थ्यांनीं
शाळेला दिला व्हाईट बोर्ड

Loading

खाऊचे पैसे वाचवत
शाळेला दिला व्हाईट बोर्ड

दि.21.4.2023 रोजी जळोद जिल्हा परिषद शाळेत इ 7 वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. या प्रसंगी इ 7 वी तील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाचे हात भरू नयेत या भावनेतून खाऊचे पैसे वाचवत एक व्हाईट बोर्ड विथ स्टँड शाळेला भेट दिला. जळोद गावाचे सरपंच सौ.भारती शशिकांत साळुंखे व दादासो. शशिकांत शांताराम साळुंखे यांचे कडून डिक्शनरी तर सावखेडा शा.व्य.स अध्यक्ष दादासो.विलास कदम यांनी मुलांना पॅड भेट दिले. मान्यवरांच्या हस्ते नमुना न 1 ल्यामिनेशन विथ बाईंडिंग करून देणारे 15 ग्रामस्थांचा शाळेकडून सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले.तसेच शाळेत BSNL चे ब्रॉडबँड बसवून त्याचे उदघाटन करण्यात आले. तालुक्यात ब्रॉडबँड असणारी पाहिली जि प शाळा जळोद ठरली. इ 5 वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आलेले 3 विद्यार्थ्यांना सरपंचांकडून स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला शा.व्य.स अध्यक्ष उपाध्यक्ष , सदस्य , सरपंच ,ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुवर सर तर आभार श्री नरेश शिरसाठ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *