1 min read

चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे पाणंद रस्ता व जलसंधारण कामांचा शुभारंभ..
मानवलोक संस्था, व भूजल अभियान यांचे मदतीने लोकसहभागातून होणार रस्ता..

Loading

चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे पाणंद रस्ता व जलसंधारण कामांचा शुभारंभ..
मानवलोक संस्था, व भूजल अभियान यांचे मदतीने लोकसहभागातून होणार रस्ता..

चाळीसगाव /प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियाना अंतर्गत जलसंधारण व पर्यावरण रक्षण यावर मोठ्या
प्रमाणात कामे सुरु आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या शेतात जाण्यासाठी असणारा रस्ता. शासन स्तरावरुन पाणंद रस्ते शिवार रस्ते योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. पण सर्वच ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहचणे लगेचच शक्य नसते.यावर उपाय म्हणजे लोकसहभागातून स्वतःची काम स्वतः करून घेणे.
याप्रमाणे तालुक्यात भूजल अभियान अंतर्गत चळवळ चालू आहे. खरजई येथे अक्षयतृतीयाचा मुहूर्त सादत ग्रामस्थांनी आपले राजकीय हेवेदावे बाजूला सारत अनेक वर्षापासून प्रलंबित पाणंद रस्त्यांचा शुभारंभ मानवलोक आंबेजोगाई चे अनिकेतजी लोहिया, सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंत दादा सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली व खरजई गावाच्या दिंडी प्रमुख सुचित्राताई पाटील, भूजल अभियान टिम व गावातील जेष्ठ नागरिक यांचे उपस्थितीत झाला.
याप्रसंगी भूजल अभियान टिमचे सोमनाथ माळी, पंकज राठोड तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक बापू शेटे,पंडित सुर्यवंशी, श्रावण पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, अर्जून एरंडे, विलास एरंडे, अभिमान म्हस्के तसेच तरुण मंडळी शुभम एरंड, राहुल सुर्यवंशी, अमोल शेजवळ, अनिल एरंडे , शुभम सुर्यवंशी, विशाल एरंडे उपस्थित होते.
या कामासाठी डाँक्टर प्रशांत एरंडे, योगेश मास्टर,तात्या गुंजाळ अमोल म्हस्के परिश्रम व पुढाकार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *