1 min read

देवगांव देवळी जिल्हा परिषद शाळेत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, ग्रामस्थांच्या समय सुचकतेमुळे अनर्थ टळला…

Loading

गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील नुकसान झालेल्या बेंचची पाहणी करतांना

जिल्हा परिषद देवगांव देवळी शाळेला शॉर्टसर्किटमुळे आग..

बेंच टेबल व कागदपत्र जळून खाक

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारी एक वाजता अचानक शॉट सर्किट मुळे आग लागल्यामुळे इयत्ता सातवीच्या वर्गातील बेंच टेबल व कपाटातील काही साहित्य जळून खाक झाले वरील आगीचे वृत्त करताच शाळेसमोरील रहिवाशी रवींद्र नवल पाटील यांनी शाळेकडे धाव घेतली व ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन व नगरपालिका येथे फोन लावून अग्निशामक यंत्रास पाचारण केले.
शाळेतील मुख्याध्यापक अरविंद सोनवणे व शिक्षकांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला गावातील काही नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्त असे की दुपारी एक वाजता अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात इयत्ता सातवीतील 21 फायबर बेंच ,1 फायबर कपाट पूर्ण जळाली, एक कपाट अर्धवट, वर्गातील पृथ्वीगोल, दोन फुटबॉल, एक लाकडी बँट ,दोन पंखे ,दोन खुर्च्या ,तीन खिडक्यांची तावदाने विद्यार्थ्यांचे लाँकर, शाळेतील वर्गशिक्षिका कल्पना साळुंखे यांचे निपुण चाचणीच्या उत्तर पत्रिका आणि संकलित चाचणी उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या, अंदाजे 74 हजार रुपयाची नुकसान झाल्याचे कळते.
देवगांव देवळी ग्रामस्थांच्या समयसूचकतामुळे जास्त नुकसान झाले नाही. गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांना माहिती कळताच यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व सर्व नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. पंचनामा करण्याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, केंद्रप्रमुख भगवान पाटील, ज्ञानेश्वर पाटील ,पदवीधर शिक्षक विश्वासराव पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सुरेश पाटील,पोलीस पाटील अविनाश बैसाणे,देवगांव देवळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *