1 min read

राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या चार खेळाडूंची निवड :

Loading

राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या चार खेळाडूंची निवड :
जळगांव प्रतिनिधी
राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील साहिल किशोर पाटील, संकल्प ईश्वरसिंग राजपूत, मयूर संदिप चांडे व कल्पेश समाधान गव्हांडे या चार खेळाडूंची राज्याच्या संघात निवड झाली आहे राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा २८ ते ३० एप्रिल दरम्यान चंदीगड येथे होत असून राज्य संघाचे सराव शिबीर २४ ते २६ एप्रिल दरम्यान अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे सदर खेळाडू जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचे विद्यार्थी असून त्यांनी शालेय राज्य डॉजबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत संघाला अजिंक्यपद मिळवून दिले होते. त्यांना जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक सुष्मीत पाटील, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, गिरीश पाटील, प्रा समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या निवडीबद्दल शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके, डॉ.पी. आर.चौधरी, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, प्रा.आशिषकुमार चौधरी, प्रशांत कोल्हे, चंद्रशेखर पाटील, डॉ रणजित पाटील, प्रा हरिश शेळके, सचिन सूर्यवंशी, राहुल साळुंखे, यांनी अभिनंदन केले आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
योगेश सोनवणे-सचिव-जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *