लाखों भाविक भक्तांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत संजिवनी समाधी सोहळादिनी महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार अतनुरात ! अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण याञे निमित्ताने
![]()

लाखों भाविक भक्तांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत संजिवनी समाधी सोहळादिनी महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार अतनुरात ! अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण याञे निमित्ताने
अतनूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रात आळंदी नंतर दुसरी संजिवनी समाधी घेणारे श्री.घाळेप्पा स्वामी महाराज व ग्रामदैवत श्री.काशी विश्वनाथ दैवत म्हणून संपुर्ण महाराष्ट्र-आंध्रप्रदेश-कर्नाटक-तेलंगना राज्यअंतर्गत लाखों भाविक भक्तांचे श्रध्दास्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या जळकोट तालुक्यातील अतनूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री.काशी विश्वनाथ मठ संस्थान अतनूर यांच्या कृपेने जिवंत समाधी घेणारे श्री. सदगुरू घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १४७ व्या. संजिवनी सोहळयानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास शुक्रवारपासून (दि.२१) एप्रिल सकाळी श्री.घाळेप्पा स्वामी महाराज यांना रूद्राभिषेकाने प्रारंभ होणार असून, या सप्ताहात दि.२८ एप्रिल पर्यंन्त झी टॉकीज फेम, महाराष्ट्रातील दिग्गज नामांकित किर्तनकार उपस्थित राहुन किर्तन सागणार आहेत.कोरोनाच्या काळानंतर असा भव्यदिव्य सप्ताह यावर्षी होणार आहे. यानिमित्ताने दैनंदिन लाखों भाविक भक्तांचे श्रद्धास्थान ग्रामदैवतांचे दररोज दर्शन होणार आहे. या अखंड हरिनाम कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे सकाळी ६ ते ७ श्री.घाळेप्पा स्वामी यांचा रूद्राभिषेक, सकाळी ७ ते १० श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथ्यावरील भजन, दुपारी २ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, राञी ९ ते ११ हरीकिर्तन, १२ ते ४ हरीजागर, पहाटे ४ ते ६ काकडाआरती असे नित्य नियमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात शुक्रवारी ( दि.२१ ) ह.भ.प.सौ.गौरीताई महाराज सांगळे ( झी टॉकीज फेम )पंढरपूर यांचे किर्तन होणार आहे. दि.२२ शनिवारी रोजी ह.भ.प.संतोष पवार महाराज लासूर स्टेशन, दि.२३ रविवार रोजी ह.भ.प.बाळासाहेब शिंदे महाराज जालना, दि.२४ सोमवार रोजी ह.भ.प.सौ.आशाताई राऊत महाराज लातूर, दि.२५ मंगळवार रोजी ह.भ.प. शिवलीलाताई पाटील महाराज बार्शीकर झी टॉकीज फेम, दि.२६ बुधवार रोजी ह.भ.प. राजेश महाराज गुंजरगेकर, दि.२७ गुरूवार रोजी दुपारी ह.भ.प.विश्वनाथ महाराज अतनूरकर यांचे गुलालाचे किर्तन होऊन रात्री ह.भ.प.सुरेंद्र महाराज गुराळकर यांचे कीर्तन, दि.२८ एप्रिल शुक्रवार रोजी श्री.संत महंत एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती श्री.संत नामदेव महाराज संस्थान उम्ररज बोरी यांचे काल्याचे किर्तन व दि.२७ सायंकाळी ५ वाजता अतनूर परिसरातील २२ गावातील वाडी-तांडा-वस्तीतील, महाराष्ट्र-आंध्रप्रदेश-कर्नाटक-तेलंगना राज्यातील भक्त गणांना व ग्रामस्थांना भंडारा-महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमास अतनूर, गव्हाण, चिंचोली, गुत्ती, कोळनूर, मरसांगवी, देवूळवाडी, कोदळी, तग्याळ, भेंडेगाव, डोरनाळी, वडगाव, नेवळी, दापका ( गुंडोपत ) जि.नादेंड येथील भजनीमंडळ, विविध जिल्हयातून प्रसिध्द किर्तनकार येणार आहेत. यावेळी विणेकरी, ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख, मृदंगवादक, गायक, हरीपाठ प्रमुख, हरीजागर प्रमुख, काकडाआरती, चोपदार ईत्यादी प्रमुखांच्या निवडी नावानिशी केली असून यांना सकाळी, दुपारी आणि सायंकाळी गावातील, परगावातील अन्नदाते अन्नदान करणार आहेत. दि.२५ रोजी माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तर, दि.२७ रोजी माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसाद होणार आहे दि.२८ रोजी पहाटे ४ वाजता पालखी सोहळा निघणार आहे. त्याचदिवशी दुपारी ४ वाजता दणदणीत जंगी कुस्तीचा कार्यक्रम होणार आहे. कुस्तीपटुंनी अगोदर नाव नोंदणी करावी नोंदविलेल्याच कुस्तीपट्टुंची कुस्ती होईल. कुठल्याच प्रकारचा भत्ता मिळणार नाही. तरी या सर्व कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, उपाध्यक्ष तथा उपसरपंच बाबूराव कापसे, यात्रा कमिटीचे मुख्यसल्लागार उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव पाटील अतनूरकर, दयानंद स्वामी महाराज, बाबूराव पंचगल्ले, माणिकराव साळुंके, सरपंच चंद्रशेखर पाटील, भंडारा-महाप्रसादाचा अन्नदाते साहेबराव आनंदराव गव्हाणे-पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, गोविंद येवरे-पाटील, ग्राहक संरक्षण परिषेदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बी.जी.शिंदे-पाटील अतनूरकर, चंद्रकांत साकोळकर जोशी, किशन मुगदळे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक तथा पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, पत्रकार संजय शिंदे व अतनूर ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

