1 min read

उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी प्रा.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लेखन गौरव सन्मानपत्र २०२३ प्रदान…..

Loading

उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी प्रा.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लेखन गौरव सन्मानपत्र २०२३ प्रदान…..

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त डॉ.गंगाधर वारके संपादित क्रांतिगाथा स्वातंत्र्याची या पुस्तकासाठी लेखन करून पुस्तकाची व उपक्रमाची उंची वाढविल्याबद्दल अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि हायमीडिया यांच्या वतीने ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या रेगे सभागृहात संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्यात उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी,मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष व जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी चे कौन्सिल सदस्य तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लेखन गौरव सन्मानपत्र २०२३ अरुण म्हात्रे जेष्ठ कवी व गीतकार,रमा सावंत वाघुले निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.याप्रसंगी विद्याधर ठाणेकर अध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय,विनायक गोखले कार्याध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय,डॉ.अलका नाईक समुपदेशिका व कवयित्री,निमंत्रक संपादक डॉ.गंगाधर वारके,कार्यकारी संपादक डॉ.योगेश जोशी व हेमंत नेहते,अतिथी संपादक सोपान बुडबाडकर,आरती मुळे,आरती कुलकर्णी व राजेंद्र गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *