महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यास 13 कोटी ६२ लाख ५१ हजार रुपयाच्या निविदेतून उष्माघाताने बळी श्री सदस्यांना 25 लाख रुपये मदत सरकारने द्यावी-संदीप घोरपडे
![]()

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यास 13 कोटी ६२ लाख ५१ हजार रुपयाच्या निविदेतून उष्माघाताने बळी श्री सदस्यांना 25 लाख रुपये मदत सरकारने द्यावी
संदीप घोरपडे
पुरोगामी विचाराचे , देशाला दिशादर्शक काम करणारे महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील कला क्रीडा विज्ञान सामाजिक क्षेत्र यासह महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या महनीय व्यक्तींना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करीत असते . हा सन्मान करताना त्या व्यक्तीच्या कार्याचा समाजाला होणारा लाभ तसेच महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे सहकार्य त्यांच्या हातून होणारे देश कार्य पुढे अधिक जोमाने घडावे यासाठी त्या व्यक्तीला त्या व्यक्तीसोबत काम करणाऱ्या समूहाला दहा हत्तींचे बळ मिळते. मात्र ही शासनाकडून त्यांची घेतली गेलेली दखल व त्यांचा केलेला योग्य सन्मान याच पातळीवर थांबायला हवा. यापूर्वी देखील अनेक मान्यवरांना अतिशय साध्या पद्धतीने छोटेखानी कार्यक्रमात या पुरस्काराने सन्मानित केले व महाराष्ट्राने शासनाचे भरभरून कौतुकही केले मात्र सतत निवडणूक प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पार्टी सरकारी खर्चाने सतत नवनवीन उत्सवी आयोजनाच्या मानसिकतेत असते याच अनुषंगाने यावर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना आपल्या सरकारच्या मागे उभे असलेली महाशक्ती यांना लोकांची गर्दी दाखविण्यासाठी आप्पा साहेबांच्या चाहत्यांना एप्रिल महिन्यातील 45 अंश सेल्सिअस तापमानात वेठीस धरले व ते देखील 13 कोटी 65 लाख 51 हजार रुपयाची सांस्कृतिक कार्य संचालनालयाची निविदा काढून.
वास्तविक महाराष्ट्र शासनावर लाखो कोटी रुपयाचे कर्ज आहे पण त्याचा कोणताही विचार न करता फक्त गृहमंत्री अमित शहा यांना एका हाके वर जमा होणारे नानासाहेब व आप्पासाहेब यांचे भक्तगण लाखोच्या संख्येने दाखवून आपली पाठ थोपटून घ्यायची होती व त्या नादात बैठकीला नियमित हजेरी लावणाऱ्या श्री सदस्यांना खारघर येथे पोहोचण्यास दोन दिवसाचा प्रवास ,प्रवासाची दगदग , रात्रीचे जागरण, आयोजकांनी ना खाण्याची व्यवस्था केली ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली ना शौचालयाची पुरेसी व्यवस्था केली. मात्र धगधगता सूर्य आग ओकत असताना जवळ असलेले बाटली दोन बाटली पाणी संपल्यावर तोंडाला पडलेली कोरड उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री उघडण्याचा प्रयत्न केला असता स्वयंसेवक छत्री बंद करायला सांगत होते याचवेळी व्यासपीठ मात्र वातानुकूलित होते . त्यामुळे उपस्थितांचे हाल कोणाच्याही लक्षात आले नाही निसर्गाने मात्र आपले काम केले व 20/ 25 सदस्य उष्माघाताचे बळी ठरले . अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे . शेकडो लोक दवाखान्यात दाखल आहेत .
म्हणून मी महाराष्ट्र शासनाकडे मृत श्री सेवकांना शासनाने काढलेल्या निविदेतून जी रक्कम कोट्यावधी रुपये आहे त्यातून 25 लाख रुपये कुटुंबीयांना भरपाई म्हणून मिळावे व यापुढे सरकारने निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जनतेस वेठीस धरू नये . या पुरोगामी महाराष्ट्रात धर्मांधता वाढणार नाही याची काळजी घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभावासाठी प्रयत्न करावा, तरुणांच्या रोजगाराची काळजी घ्यावी, महिलांवर अत्याचार होणार नाही त्यांना सन्माननीय वागणूक मिळेल असा पायंडा देशापुढे घालून द्यावा . तसेच तमाम श्री सदस्यांची मोठ्या मनाने माफी मागावी व लोककल्याणाच्या कामाकडे लक्ष वळवावे उगाच व्यक्तीस्तोम न माजवता किंवा विरोधी पक्षाची टिंगल टवाळी न करता त्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे यातूनच संपूर्ण देश महाराष्ट्राकडे ज्या आपुलकीने पाहतो ते कार्य आपल्या हातून घडेल सध्या इतकेच .
आपलाच संदीप घोरपडे अमळनेर

