1 min read

वृक्ष लागवड जसे महत्वाचे तसे संवर्धनही महत्त्वाचे-
पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव,खान्देश स्तरीय पूज्य सानेगुरूजी स्मृती पुरस्कार अंबर्षी टेकडी गृपला
प्रदान,

Loading

वृक्ष लागवड जसे महत्वाचे तसे संवर्धन ही महत्त्वाचे
पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव

खान्देश स्तरीय पूज्य सानेगुरूजी स्मृती पुरस्कार अंबर्षी टेकडी गृपला
प्रदान…

मराठी गझल मुशायरा कार्यक्रम संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील विकासामध्ये नागरिककांचे योगदान हि महत्त्वपूर्ण आहे. चांगल्या कामाची चांगली पावती मिळते, लोकसहभागातून चांगली कामे होतात ते अमळनेरांनी सिद्ध केले आहे. अंबऋषी टेकडीतील ग्रुपने एक नंदनवन साकारले आहे. आज अनेक लोकांचे हात त्या ठिकाणी कामाला लागले आहेत त्यातून आज निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या चांगल्या कामाची पावती साने गुरुजी वाचनालयाने घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले याचा अभिमान वाटतो. वृक्ष लागवड जसे महत्त्वाचे आहे तसेच संवर्धनही महत्त्वाचे आहे आपण या दोन्ही गोष्टी करीत आहात असे अमळनेर साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने जुना टाऊन हॉलमध्ये कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना उपाधीक्षक राकेश जाधव बोलत होते.
व्यासपीठावर गझलकार संदीप पटेल मुंबई, जयश्री कुलकर्णी नाशिक, विनय पाटील चोपडा,शरद धनगर अमळनेर, योगिता पाटील चोपडा, अध्यक्ष दिलीप सोनवणे सचिव प्रकाश वाघ उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर होते. मान्यवरांनी सानेगुरुजी यांच्या पुतळ्याचे माल्यार्पण करत कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिलीप सोनवणे यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन भगिनी मंडळाच्या शिक्षीका ज्योती सोनवणे यांनी केले.
अंबर्षी टेकडी गृप अमळनेर यांचे पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी खान्देश स्तरीय पूज्य सानेगुरुजी स्मृती पुरस्कार उपविभागीय अधिकारी राकेशजी जाधव व.वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचीव प्रकाश वाघ,उपाध्यक्षा प्रा.डॉ माधुरी भांडारकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह, शाल ,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्काराला उत्तर देतांना अंबऋषी टेकडीचे सदस्य आशिष चौधरी म्हणाले की आज अंबऋषी टेकडीवर तरुणांपासून तर वयोवृद्ध महिला व पुरुष श्रमदान करून आज हजारो झाडे जगली आहेत व त्याचे संवर्धन घेतले जाते. सानेगुरुजी वाचनालयाने आमच्या चांगल्या कामाचा सन्मान केला यातून कार्य करण्याची अजून प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले.

गझलकरांनी श्रोत्यांना केले लोटपोट

एक सामान्य वाचक किंवा रसिक म्हणून गझल हा काव्यप्रकार आवडण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे अत्यंत कमीत कमी शब्दात बरचं काही सांगण्याची कसब दोन ओळीत म्हणजे एका शरात सहज साध्य होते. गझल हा काव्यप्रकार मराठीत खऱ्या अर्थाने लोकप्रिय केला तो सुरेश भट यांनी याबद्दल कुणाचीही दुमत नाही .मराठीत गझल लिहायला सुरुवात झाली. सुरेश भटांचा एक शेर जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा ,विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही; आज आधार घेऊन मराठीत गझल हा लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे सादरकर्ते संदीप पटेल मुंबई, जयश्री कुलकर्णी नाशिक, विनय पाटील चोपडा,शरद धनगर अमळनेर, योगिता पाटील चोपडा यांनी विविध प्रकारचे शेअर व गझल सादर करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्वच गझलकार एकाहून एक तोडीचे शेर सादर करीत होते. गझलकार यांनी सांगितले की
श्रोत्याची दाद हि कवीची जाहिरात असते. गझल व शेरला श्रोत्यांचा रिस्पॉन्स असणेही तेवढेच महत्त्वाचे असते असे सांगत रात्री दोन तास गझलकरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत लोटपट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. आभार प्रदर्शन दीपक वाल्हे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे
सचीव प्रकाश वाघ
उपाध्यक्ष प्रा डॉ माधुरी भांडारकर, विश्वस्त बापू नगांवकर, संयुक्तचिटणीस सुमित धाडकर, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव,पी.एन भादलीकर,अँड रामकृष्ण उपासनी,
ईश्वर महाजन,प्रसाद जोशी,दिपक वाल्हे,निलेश पाटील सह वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *